गणेशोत्सव काळात तपासणीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:06 IST2021-09-02T05:06:45+5:302021-09-02T05:06:45+5:30
रत्नागिरी : गणेशोत्सव काळात मेवा तसेच इतर मिठाई पदार्थांतून भेसळ टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तपासणी करा, अशा सूचना ...

गणेशोत्सव काळात तपासणीचे आदेश
रत्नागिरी : गणेशोत्सव काळात मेवा तसेच इतर मिठाई पदार्थांतून भेसळ टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तपासणी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी सभागृहात अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ जिल्हास्तरीय समिती, दूध भेसळीला आळा घालण्यासाठीची जिल्हास्तरीय समिती व केंद्रीय तंबाखू नियंत्रण कायदा २००३ च्या कलम ५ अंतर्गत बजावणीचा आढावा घेण्यासाठी नियंत्रण कक्ष समिती आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी सूचना दिली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, उपजिल्हाधिकारी राजश्री मोरे, सहायक आयुक्त (अन्न) सं. भा. नारागुडे, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, अन्न सुरक्षा अधिकारी विजय पाचुपते आदी उपस्थित होते.
सहायक आयुक्त सं. भा. नारागुडे यांनी अन्न व औषध प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या तपासणीसत्राची तसेच केलेल्या कारवाईबाबत माहिती दिली.
जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी शाळांमध्ये ईट-टाईड फूड कॅम्पियन राबविण्याची सूचना केली. तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास प्रतिबंध असलेल्या ठिकाणी तपासणी करण्याबरोबरच भेसळ टाळण्यासाठी हॉटेल्समध्ये स्पॉट तपासणी करण्याची सूचना केली.