शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

ग्रामपंचायती जोडणार आॅप्टीकल फायबर केबलने

By admin | Updated: October 2, 2014 00:19 IST

सुहास कांबळे : बीएस्एन्एल्चा २२.८ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

रत्नागिरी : जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ३८६ ग्रामपंचायती लवकरच फायबर आॅप्टिकल नेटवर्कने जोडल्या जाणार आहेत. हा (ठऋडठ) प्रकल्प २२.८ कोटी रूपयांचा असल्याची माहिती भारतीय दूरसंचार निगम (बीएसएनएल)चे महाप्रबंधक सुहास कांबळे यांनी आज पत्रकारांना दिली. आज बीएसएनएलचा १४वा वर्धापन दिन असल्याने कांबळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कंपनीची १४ वर्षांची वाटचाल विशद करून नव्या योजनांसंबधी माहिती दिली.२००० साली निर्मिती झालेल्या बीएसएनएनएलने गेल्या १४ वर्षात ग्रामीण भागात आपली सेवा पोहोचवली आहे. आज प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बीएसएनएलचे उपविभागीय कार्यालय आहे. जिल्ह्यात १७१ टेलिफोन एक्स्जेंच असून, तर एकूण १९४ मोबाईल टॉवर्स आहेत. यापैकी ६३ टेलिफोन सुविधेसाठी कार्यरत आहेत, तर ५१ टॉवर्स मोबाईल्स आणि इतर अत्याधुनिक (सीडीएमए) वायरलेस अत्याधुनिक सेवांसाठी कार्यरत आहेत. जिल्ह्यात ६ मोठी एक्स्चेंज असून, त्यातील एक रत्नागिरीत आहे, तर उर्वरित सहा इतर ठिकाणी आहेत. शहरी भागात ४१, तर ग्रामीण भागात १२४ ठिकाणीही ही सुविधा उपलब्ध आहे. महाराष्ट्रात ५ ठिकाणी सॅटेलाईट सेवा सुरू असल्याने माळीणसारख्या दुर्घटनेवेळीही बीएसएनएल सेवा अवघ्या चार तासात तिथपर्यंत पोहोचू शकली, असे कांबळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.नॅशनल फायबर आॅप्टिकल नेटवर्क (ठऋडठ) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर, खेड आणि मंडणगड या चार तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबर नेटवर्कने जोडल्या जाणार आहेत. यासाठी निविदा मागविण्याची प्रकिया सुरू असून, मार्चअखेर हा प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत, असेही कांबळे यांनी सांगितले.खासगी कंपन्यांनी भाडेतत्त्वावर घेतलेले टॉवर अटी पूर्ण न केल्याने पडून आहेत. ते टॉवर घेऊन अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून ग्राहकांना अधिकाधिक सेवा देण्याचा बीएसएनएलचा प्रयत्न आहे. सध्या बीएसएनएलच्या हकछछ, छअठऊछकठए, इफडअऊइअठऊ, कळउ, ऊअळअ, टडइकछए, छएअरएऊ छकठए, करऊठ आदी सेवा सुरू आहेत. कमी भाडे, तांत्रिक समस्येचे निवारण, जलद ब्रॉडबँड सेवा, सिंगल विंडो सर्व्हिस, प्रवासात कुठेही वापरावी, अशा सेवा असल्यानेच देशात बीएसएनएल सर्व कंपन्यांपेक्षा अग्रेसर असल्याचे कांबळे यांनी सांगितले.यावेळी उपमंडल अभियंता पी. आर. पारोलकर यांनीही नव्या योजनांविषयी माहिती दिली. सध्या रत्नागिरी शहरापुरता ‘मागेल त्याला कनेक्शन’ हा प्रकल्प राबविला जात असून, त्यानंतर जिल्हाभर राबविला जाईल. हाही प्रकल्प मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. ‘एक खिडकी’ या सर्व सुविधा एकाच छत्राखाली ग्राहकांना उपलब्ध करून देण्याची सुविधा सध्या रत्नागिरी शहरात सुरू झाली आहे. यानंतर आता गुहागरात ही सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे, अशी माहिती देण्यात आली. २००६ सालापासून अपुऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांमुळे बीएसएनएल कंपनीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. अजूनही ५० टक्के कर्मचारीवर्ग कमी आहे. त्यांच्या सहाय्याने ग्राहकांना अधिकाधिक सुविधा दिली जात असल्याचे ते म्हणाले.याप्रसंगी मंडल अभियंता एन. डी. राखेलकर, ए. व्ही. ठाकूर, सहायक महाप्रबंधक अश्विनी लेले, उपमंडल अभियंता पी. आर. पारोलकर, डी. एन. नाटेकर, अंजली गुणे, संदेश खटावकर, योगेश भोंगले, आर. जे. सावंत, कनिष्ठ अभियंता नंदकिशोर कदम, मुख्य लेखाधिकारी पी. जी कांबळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘गो ग्रीन’ योजनाग्राहकांनी त्यांचा मोबाईल नंबर तसेच मेल आयडी दिल्यास बिलाची माहिती त्यांना कळवली जाईल. आॅनलाईन बिल भरल्यास त्यांना बिलात एक टक्का सूट मिळणार आहे. बीएसएनएलतर्फे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक ३३०० शाळा इंटरनेट सेवेने जोडल्या जाणार आहेत. असेही महाप्रबंधक सुहास कांबळे यांनी याप्रसंगी केले.जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबरने जोडल्या जाणार आहेत. त्यांची संख्या तालुकानिहाय जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबरने जोडल्या जाणार आहेत. त्यांची संख्या तालुकानिहाय