जिल्ह्यात केवळ दोन गोठ्यांचे काम

By Admin | Updated: July 11, 2014 00:06 IST2014-07-10T23:56:02+5:302014-07-11T00:06:00+5:30

सात तालुके कामाविना : मग्रारोहयोजनेंतर्गत जिल्ह्यातील कामांना मुहूर्त कधी मिळणार....

Only two stops work in the district | जिल्ह्यात केवळ दोन गोठ्यांचे काम

जिल्ह्यात केवळ दोन गोठ्यांचे काम

रत्नागिरी : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात केवळ १२६ गोठे मंजूर करण्यात आले असून, त्यापैकी केवळ २ कामे पूर्ण झाली आहेत. सात तालुक्यांमध्ये एकही काम पूर्ण झालेले नाही.
ग्रामीण भागातील स्थानिक मजुरांना काम मिळावे, या उद्देशाने शासनाने मग्रारोहयो सुरु केली. मात्र, मजूर मिळत नसल्याची ओरड आजही सुरु आहे. जिल्ह्यात या योजनेला गती मिळावी, यासाठी जिल्ह्यात ५७ ग्रामपंचायतींमध्ये ही योजना मॉडेल म्हणून राबविण्यात येत आहे. या गावांमध्येही योजना योग्य प्रकारे राबविण्यात येत नसल्याचे पुढे आले आहे.
जिल्ह्यात या योजनेतून फळबाग लागवड, विहिरी, तलाव, पाझर तलावातील गाळ उपसणे, बंधारे बांधणे, राजीव गांधी भवन, स्वच्छतागृह बांधणे व अन्य कामे जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात सुरु आहेत. त्यामध्ये या योजनेअंतर्गत जिल्हाभरातून जनावरांसाठी गोठा बांधण्याचा प्रस्ताव मागणवण्यात आले होते. त्यासाठी ६०४ गोठ्यांचे प्रस्ताव आले होते. त्यापैकी केवळ १२६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.
या मंजूर कामांपैकी केवळ १२ कामे सुरु आहेत. त्यामध्ये दापोली तालुक्यातील ५, खेड, रत्नागिरी व लांजा या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक काम आणि गुहागर व संगमेश्वर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी दोन कामे सुरु आहेत. या कामांमध्ये रत्नागिरी व लांजा तालुक्यात प्रत्येकी एक अशी एकूण दोन कामे सुरु आहेत. तसेच मंडणगड, चिपळूण व राजापूर या तालुक्यांमध्ये एकही काम सुरु झालेले नाही. त्यामुळे उर्वरित कामे कधी पूर्ण होणार व अन्य कामांना मंजुरी कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील दापोली, चिपळूण, राजापूरमध्ये या योजनेंतर्गत काम शून्य असल्याने पुढील योजनेतया तालुक्यामधून चांगले काम व्हावे अशी या योजनेंतर्गत स्थानिक मजुरांना काम मिळावे असा प्रयत्न केला जात आहे.
मंडणगड १ १
दापोली १४ १४
खेड २३ ६
चिपळूण२१७ १३
गुहागर१०८ १५
संगमेश्वर ६७ १३
रत्नागिरी१०६ ६
लांजा ५५ ५५
राजापूर १३ २
एकूण- ६०४१२६

Web Title: Only two stops work in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.