कोरोनाचे केवळ ५१ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST2021-09-14T04:37:56+5:302021-09-14T04:37:56+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी जिल्ह्यात आलेले असतानाही रुग्णसंख्या वाढलेली नाही, ही जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यात ...

कोरोनाचे केवळ ५१ नवे रुग्ण
रत्नागिरी : जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी जिल्ह्यात आलेले असतानाही रुग्णसंख्या वाढलेली नाही, ही जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यात केवळ ५१ बाधित रुग्ण दिवसभरात आढळले आहेत. ४४ रुग्णांनी कोरोनातून बरे झाले आहेत, तर एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत १,२८३ बाधित जिल्ह्याच्या विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात आरटीपीसीआरच्या घेतलेल्या १,५३७ चाचण्यांमध्ये ३० रुग्ण तर १,५७१ ॲन्टिजन चाचण्यांमध्ये २१ रुग्ण आढळले. त्यात मंडणगड तालुक्यात १ रुग्ण, दापोलीत ६, खेडमध्ये ४, गुहागरात ३, चिपळुणात ९, संगमेश्वरात ५, रत्नागिरीत १९, लांजात १ आणि राजापुरात ३ रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्ण ७६,९९३ झाले आहेत.
जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यात केवळ एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण २,३७३ काेरोनाबाधित दगावले आहेत. बाधितांच्या मृत्यूचा दर ३.८ टक्के आहे. ७३,३३७ रुग्णांनी कोरोनामुक्त झाले असून त्यांचा बरे होण्याचा दर ९५.२५ टक्के आहे.