खनिज परवानाधारकांसाठी उद्यापासून ऑनलाईन प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:35 IST2021-09-22T04:35:28+5:302021-09-22T04:35:28+5:30
लांजा : रत्नागिरी जिल्ह्यातील गौण खनिज परवानाधारक, लिलाव व खाणपट्टाधारक यांना ‘महाखनिज’ या ऑनलाईन प्रणालीचे दिनांक २३ ...

खनिज परवानाधारकांसाठी उद्यापासून ऑनलाईन प्रशिक्षण
लांजा :
रत्नागिरी जिल्ह्यातील गौण खनिज परवानाधारक, लिलाव व खाणपट्टाधारक यांना ‘महाखनिज’ या ऑनलाईन प्रणालीचे दिनांक २३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हा खनिकर्म अधिकारी दि. म. पाटील यांनी प्रशिक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
हे प्रशिक्षण २३ सप्टेंबर राजापूर व लांजा, २४ सप्टेंबर संगमेश्वर, २७ सप्टेंबर रत्नागिरी, २८ सप्टेंबर चिपळूण व खेड, २९ सप्टेंबर दापोली व मंडणगड, ३० सप्टेंबर रोजी गुहागर येथे सकाळी ११ ते १ दुपारी ३ ते ५.३० या वेळेत प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात होणार आहे. सागर पवार यांच्यामार्फत ‘महाखनिज’ या ऑनलाईन प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाला सर्व तलाठी, मंडल अधिकारी, संबंधित कार्यालयातील कर्मचारी, तसेच गौणखनिज परवानाधारक, लिलावधारक आणि खाणपट्टाधारक यांच्यासाठी असणार आहे. यासाठी विशेषत: गौणखनिज उत्पादकांसाठी या प्रशिक्षणाला उपस्थित राहण्याचा आग्रह करण्यात आलेला आहे. ही अधिकृत माहिती खनिकर्म अधिकारी यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आली आहे.