एक वर्षात हर्णै गाव समस्यामुक्त करणार

By Admin | Updated: December 8, 2015 00:37 IST2015-12-07T23:20:31+5:302015-12-08T00:37:48+5:30

संजय कदम : दापोली तालुक्यातील हर्णै येथील पहिल्या दत्तक ग्राम योजना बैठकीत सुतोवाच

One year, Hiranya village will get trouble free | एक वर्षात हर्णै गाव समस्यामुक्त करणार

एक वर्षात हर्णै गाव समस्यामुक्त करणार

दापोली : येत्या वर्षभरात हर्णै गावातील एकही समस्या औषधाला देखील शिल्लक राहणार नाही, असे सुतोवाच आमदार संजय कदम यांनी हर्णै येथे केले. आपल्या दत्तक ग्राम योजनेच्या मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.
दापोली तालुक्यातील हर्णै येथे आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत दाखले वाटपाचा कार्यक्रम दापोली - मंडणगड - खेडचे आमदार संजय कदम यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पार पडला. यावेळी संजय कदम यांनी सांगितले की, हर्णै खेम धरणाचा गाळ काढणे, रस्ता रूंदीकरण करणे, पर्यटकांना सुखसुविधा उपलब्ध करणे, शौचालये बांधणे, विजेपासून वंचित असणाऱ्या हर्णैमधील सहा घरांना विजेची जोडणी देणार असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी आमदार कदमांसमोर गावातील समस्यांचा पाढा वाचला.
यावेळी अधिवास व जाती दाखल्यांचे वाटप तसेच अंगणवाडीत सुदृढ बालक स्पर्धा घेण्यात आली. यात ६ बालकांना पारितोषिक देण्यात आले. बचत गटातील सदस्य ज्यांच्याकडे स्वत:ची शौचालये आहेत अशांना प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाला दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. अमोल भोसले, नायब तहसीलदार मंगेश आंबेकर, पंचायत समिती सदस्या योगिता बांद्रे, विष्णू तबीब, जिल्हा परिषद सदस्या सुजाता तांबे, हर्णैच्या सरपंच मुनिरा शिरगावकर, उपसरपंच दीपक खेडेकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष अनंत पाटील, पी. एम. चोगले, सुनील आंबुर्ले, आठ मोहल्ल्यांचे अध्यक्ष हसनमियाँ साखरकर, रवींद्र मेहेंदळे, माजी सरपंच अंकुश बंगाल, अस्लम अकबाणी, अमानुल्ला महालदार, हर्णैच्या बारा वाड्यांचे अध्यक्ष अविनाश निवाते, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पावसे, अशोक दोरकुळकर, प्रतीक्षा तलवटकर, ऐश्वर्या बोरकर, समीरा आंबटकर, प्रतीक्षा प्रभुलकर, मामुदखान मौलवी, सज्जाद जावकरकर, साजिया हजवानी, ज्योती गुरव, तलाठी प्रकाश साळवी, कोतवाल प्रणिता वेदपाठक, एन. डी. गोळे हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. बी. पाठक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

दापोली तालुक्यातून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आमदार संजय कदम यांनी विधानसभा मतदार संघाचा विकास करण्याचा निर्धार केला आहे. मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले असून, आपला दबदबा निर्माण करण्यास सुरूवात केली आहे.

Web Title: One year, Hiranya village will get trouble free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.