शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

चाकरमान्यांसाठी खुशखबर!, कशेडी घाटातील कोकणात येण्यासाठीचा मार्ग खुला

By मनोज मुळ्ये | Updated: February 24, 2024 16:34 IST

कशेडी घाटातील ताण कमी होणार

रत्नागिरी / खेड : शिमग्यासाठी कोकणात येणाऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग विभागाने खुशखबर दिली आहे. कशेडी घाटातील बोगद्याचा एक मार्ग शनिवार २४ फेब्रुवारीपासून सुरू झाला असून, मुंबईहून कोकणात येणारी वाहने या बोगद्याचा वापर करू शकतात. सद्यस्थितीत मुंबईकडे जाण्यासाठी कशेडी घाटाचाच वापर करावा लागत असला तरी दुसऱ्या बोगद्यातील कामही अंतिम टप्प्यात आले असल्याने मार्चपर्यंत तो बोगदाही सुरू केला जाणार आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. गणेशोत्सव काळात महामार्गावर वाढणारी गर्दी लक्षात घेऊन एका मार्गिकेचा वापर सुरू करण्यात आला होता. गणेशोत्सवाआधीचे काही दिवस कोकणात येणाऱ्या गाड्या या बोगद्यातून आल्या. गणेश विसर्जनानंतर हा बोगदा मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी खुला करण्यात आला. मात्र काही दिवसाच्या वापरानंतर तो बंद करण्यात आला. आतील फिनिशिंगची काही कामे झालेली नव्हती.आता एका मार्गिकेचे (एका बोगद्याचे) सर्व काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंबईहून येणाऱ्या गाड्यांसाठी हा बोगदा खुला झाला आहे. शनिवारपासून त्याचा वापरही सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात कार तसेच छोट्या गाड्यांना येथून जाण्याची मुभा आहे. मात्र मोठ्या गाड्याही लवकरच या बोगद्यातून सोडल्या जाणार आहेत. कशेडी बोगदा हा २ किलोमीटर लांबीचा असून, या ठिकाणी ४० किलोमीटर प्रति तास एवढी वेग मर्यादा वाहनांनी पाळणे आवश्यक आहे.

गणेशोत्सवापाठोपाठ जिल्ह्यातील सर्वात मोठा सण म्हणून शिमगा उत्साहात साजरा होता. त्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबईहून कोकणात येतात. त्यामुळे महामार्गावरील गर्दी वाढते. आता एक बोगदा खुला झाल्याने कशेडी घाटातील ताण कमी होणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMumbaiमुंबईhighwayमहामार्ग