रत्नागिरी : चाकरमानी गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी एक मार्गिका पूर्ण करण्याच्या सूचना आपण दिल्या आहेत. त्यानुसार कामाला गती आली आहे. कशेडी बोगदाही पूर्णत्वाकडे जात आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.मंत्री चव्हाण यांनी पनवेपासून महामार्ग चौपदरीकरण कामाची पाहणी सुरू केली आहे. कशेडी बोगद्यातील काम पाहिल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.पावसाळ्यात काँक्रिटीकरण करण्याबाबत शंका होती. मात्र २०० मीटर अंतरावर प्लास्टिकचे आच्छादन वापरुन काँक्रिटीकरण केले जात आहे. त्यामुळे काम चांगल्या दर्जाचे व गतीने होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कशेडीतील एक बोगदा गणेशोत्सवापर्यंत पूर्ण होणार - मंत्री रवींद्र चव्हाण
By मनोज मुळ्ये | Updated: July 14, 2023 16:17 IST