रत्नागिरीत मोटार दरडीवर आदळून एकजण ठार

By Admin | Updated: January 7, 2015 23:51 IST2015-01-07T23:40:04+5:302015-01-07T23:51:08+5:30

गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी उजव्या बाजूच्या दरडीवर जाऊन आदळली.

One in the Ratnagiri collapsed on the motorbike and killed one | रत्नागिरीत मोटार दरडीवर आदळून एकजण ठार

रत्नागिरीत मोटार दरडीवर आदळून एकजण ठार

रत्नागिरी : रत्नागिरी-हातखंबा मार्गावरील टीआरपी येथे भरधाव मोटार रस्त्याच्या बाजूला असलेल्या दरडीवर आदळल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले. त्यातील एकाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान आज, बुधवारी सकाळी मृत्यू झाला. शमसुद्दीन इमाम हुसेन काझी (वय ४३, रा. पठाणवाडी, भगवतीबंदर, रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. काल, मंगळवारी मध्यरात्री १२.०५ वाजता हा अपघात झाला. शमसुद्दीन काझी हे आपल्या ताब्यातील होंडा सीटी (एमएच-०८/डीआर ४८५८) घेऊन हातखंबा येथून रत्नागिरीकडे येत होते. रात्री १२.०५ वाजता टीआरपी येथील मेघमल्हार हॉटेलच्या समोर काझी यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी उजव्या बाजूच्या दरडीवर जाऊन आदळली. त्यात गाडीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शमसुद्दीन यांना गाडीतच असलेले त्यांचे वडील इमाम काझी यांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. इमाम काझीही किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमी शमसुद्दीन यांचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. (प्रतिनिधी)

Web Title: One in the Ratnagiri collapsed on the motorbike and killed one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.