एकांकिका स्पर्धा : आंबेडकर महाविद्यालयाची ‘राजा’ सर्वोत्कृष्ट

By Admin | Updated: August 21, 2014 00:28 IST2014-08-20T21:43:14+5:302014-08-21T00:28:18+5:30

स्पर्धेतील व्दितीय क्रमांक गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘ब्रेन’ एकांकिकेने मिळविला.

One-piece competition: 'King' of Ambedkar College is the best | एकांकिका स्पर्धा : आंबेडकर महाविद्यालयाची ‘राजा’ सर्वोत्कृष्ट

एकांकिका स्पर्धा : आंबेडकर महाविद्यालयाची ‘राजा’ सर्वोत्कृष्ट

रत्नागिरी : महाराष्ट्रीय कलोपासक, पुणेतर्फे सावरकर नाट्यगृह येथे झालेल्या पुरूषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. सांघिक स्पर्धेत डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूणने सादर केलेल्या ‘पेज नं. २३ने प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच प्रायोगिक एकांकिकेमध्ये आंबेडकर महाविद्यालयाने सादर केलेली ‘राजा’ एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली आहे.
डी. बी. जे. महाविद्यालय पुरूषोत्तम करंडकांचे मानकरी ठरले आहे. स्पर्धेतील व्दितीय क्रमांक गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘ब्रेन’ एकांकिकेने मिळविला. याच महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘हिय्या’ एकांकिकेने तृतीय क्रमांक मिळविला. त्यामुळे गो-जो महाविद्यालयाने अनुक्रमे सुमनताई करंडक, पंढरीनाथ नेने करंडक मिळविले आहेत. स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनय नैपुण्य स्वानंद देसाई (ब्रेन) गो-जो महाविद्यालयाने मिळविले. सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय नैपुण्य मयूर साळवी (राजा) बाबासाहेब आंबेडकर, महाड याने मिळवला. सर्वोत्कृष्ट अभिनेता ओंकार भोजने (पेज नं. २३ ) डी. बी. जे. महाविद्यालय, अभिनेत्री काजल सावंत (मृगाचा पाऊस) कृषी महाविद्यालय, दापोली, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक व लेखक म्हणून ओंकार भोजने (पेज नं. २३ ) डी. बी. जे. महाविद्यालय याना गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: One-piece competition: 'King' of Ambedkar College is the best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.