चिपळुणात एका दिवसात सापडले २९ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:19 IST2021-03-30T04:19:32+5:302021-03-30T04:19:32+5:30
चिपळूण : तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी तालुक्यात २९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात वहाळ आरोग्य ...

चिपळुणात एका दिवसात सापडले २९ रुग्ण
चिपळूण : तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी तालुक्यात २९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात वहाळ आरोग्य केंद्रांतर्गत तब्बल १२ रुग्णांचा समावेश आहे. तर तालुक्यातील एकूण १३५ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत तालुक्यात १०९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
गेल्या दोन महिन्यात कोरोनाचा प्रभाव काहींसा कमी झाला होता. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने शासनाच्या निर्देशानुसार लसीकरणावर अधिक लक्ष केंद्रित केले होते. महिनाभरापूर्वी तालुक्यात अवघे २० रुग्ण अॅक्टिव्ह होते. मात्र आता या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून गेल्या काही दिवसात हे प्रमाण अधिक वाढले आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा तितकाच प्रभाव वाढला आहे. गेल्या तीन दिवसात सलग २४ ते २५ रुग्ण दररोज आढळून येेत आहेत. अशातच सोमवारी आलेल्या अहवालानुसार तालुक्यात २९ रुग्ण नव्याने आढळले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १३५ वर पोहोचली असून येथील आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा खडबडून जागी झाली आहे.
सध्या शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेने अनेक ठिकाणी उत्सव व यात्रेस परवानगी नाकारली तरी काही ठिकाणी साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला जात आहे. त्यातच लग्नसराईही सुरू आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता प्रशासनाने आधीच व्यक्त केली होती. त्यानुसार सलग रुग्ण आढळत असल्याने आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
चाैकट
तालुक्यातील वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या एका गावात लग्नसमारंभ निमित्ताने मुंबईतून आलेली व्यक्ती कोरोनाबाधित असल्याने त्यापासून तब्बल १२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याशिवाय शहरासह तालुक्यात एकूण २९ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यात शिमगोत्सवात कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच आहे. त्यामुळे धार्मिक कार्यक्रमात गर्दी न करता सोशल डिस्टन्स पाळून सण साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.