लांजात एका दिवसात २१ काेराेनाचे रुग्ण, एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:30 IST2021-04-18T04:30:46+5:302021-04-18T04:30:46+5:30

लांजा : तालुक्यात दिवसागणिक कोरोना रुग्णामध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. शुक्रवारी लांजा शहरात कोरोनाचे १० तर ...

One day, 21 patients died in Lanjat, one died | लांजात एका दिवसात २१ काेराेनाचे रुग्ण, एकाचा मृत्यू

लांजात एका दिवसात २१ काेराेनाचे रुग्ण, एकाचा मृत्यू

लांजा : तालुक्यात दिवसागणिक कोरोना रुग्णामध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. शुक्रवारी लांजा शहरात कोरोनाचे १० तर ग्रामीण भागात ११ रुग्ण पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले. यामधील कुर्णे येथील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

तालुक्यात गुरुवारी एकूण पाच रुग्ण आढळले हाेते. मात्र, शुक्रवारी कोरोनाच्या रुग्णामध्ये झपाट्याने एका दिवसामध्ये तब्बल २१ कोरोनाचे रुग्ण आढळल्याने शहराबरोबरच ग्रामीण भागातही चिंता वाढली आहे. शहरातील कुरूपवाडी येथील १४ वर्षीय युवक, ४८ वर्षीय पुरुष, ४४ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला, बसवेश्वर चौक येथील ५३ वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय महिला, कनावजेवाडी येथील २७ वर्षीय महिला, तेलीवाडी येथील ३५ वर्षीय तरुण, डाफळेवाडी येथील ४४ वर्षीय पुरुष असे रुग्ण आढळले आहेत.

ग्रामीण भागात आसगे येथील २४ वर्षीय महिला, आंजणारी पाष्ट्येवाडी येथील ५४ वर्षीय पुरुष, देवधे मणचेकरवाडी ७० वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला, आडवली येथील ५५ वर्षीय पुरुष, केळंबे आंबेवाडी येथील ५६ वर्षीय महिला, विवली बौद्धवाडी येथील २७ वर्षीय तरुण, उपळे विरगांव येथील ३१ वर्षीय महिला, खोरनिनको येथील ४५ वर्षीय पुरुष, शिपोशी सुतारवाडी येथील ३८ वर्षीय पुरुष काेराेनाबाधित आढळले, तर कुर्णे पड्येवाडी येथील ६० वर्षीय प्रौढाला उपचारासाठी रत्नागिरी येथे घेऊन जात असतानाच वाटेतच मृत्यू झाला.

Web Title: One day, 21 patients died in Lanjat, one died