शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

एका क्लिकवर मिळणार कोकणातील पिकांची माहिती, कोकण कृषी विद्यापीठाकडून संकेतस्थळ अद्ययावत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 13:23 IST

पिकांची माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून ॲण्ड्रॉइड फोनवरही उपलब्ध होणार

शिवाजी गोरेदापोली : कोकणातील पिकांची माहिती, आधुनिक तंत्रज्ञान अवजारे, शेती सल्ला शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होण्यासाठी दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आपले संकेतस्थळ अद्ययावत केले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना एका क्लिकवर सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच दापोली येथील माहिती तंत्रज्ञान कार्यालयात कोकणातील पिकांची माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून ॲण्ड्रॉइड फोनवरही उपलब्ध होणार आहे.

कोकण कृषी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व जिल्हे पेपरलेस पद्धतीने जोडले जात आहेत.आधुनिक काळात शेतकऱ्यांच्या हातामध्ये ॲण्ड्रॉइड मोबाइल उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. याचा विचार करून कोकण कृषी विद्यापीठाने त्यांचे संकेतस्थळ अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या संकेतस्थळाच्या माध्यमातून पिकांची माहिती, आधुनिक तंत्रज्ञान अवजारे यासह शेतीविषयक सल्ला देण्यात येणार आहे.राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या सहली दापोली कोकण कृषी विद्यापीठाला भेट देण्यासाठी येतात. या सहलीदरम्यान कोकणातील भातशेती, नारळ, सुपारी, मसाला पिके, आंबा, काजू व विद्यापीठाने विकसित केलेले आधुनिक तंत्रज्ञान, अवजारे ही सर्व माहिती घेण्यास शेतकरी उत्सुक असतात.

परंतु, शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी कर्मचारी वेळेवर उपस्थित होत नाही. त्यामुळे त्यांना माहिती मिळण्यात अडचणी निर्माण होत होत्या. ही गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने संकेतस्थळ अद्ययावत करण्याकडे लक्ष दिले आहे. तसेच यापूर्वी तयार केलेल्या संकेतस्थळात काही त्रुटी होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना माहिती मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. या त्रुटीही दूर करण्यात आल्या आहेत.

कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रातील पिकांची व आधुनिक संशोधन तंत्रज्ञान या सर्वांची माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून मोबाइलवर उपलब्ध होणार आहे. स्कॅन केलेली माहिती पीडीएफच्या माध्यमातून मोबाइलमध्ये डाउनलोड करता येणार आहे. त्यामुळे कोकणासह राज्यातीलच शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे.

सध्या सर्व कामकाज पेपरलेस होत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्याच मोबाइलवर सहज माहिती उपलब्ध व्हावी. तसेच शेतकऱ्यांसमोरील आव्हाने, पिकावरील रोग ही सर्व प्रकारची माहिती शेतकऱ्यांना एका क्लिकवर उपलब्ध होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. - डॉ. संजय सावंत, कुलगुरु, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीagricultureशेतीuniversityविद्यापीठ