शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सावर्डे येथे पकडला जनावरे नेणारा टेम्पो, एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 12:54 IST

खेड आणि चिपळूण तालुक्यात गोवंश हत्त्येचे प्रकार घडत असतानाच गुरूवारी रात्री सावर्डे पोलिसांनी वहाळ फाटा येथे बैलांची वाहतूक करणारा आयशर टेम्पो ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गाडीमध्ये एकूण १७ बैल असून, याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

ठळक मुद्देसावर्डे येथे पकडला जनावरे नेणारा टेम्पो, एकाला अटक सावर्डे पोलिसांची मोठी कारवाई

चिपळूण : खेड आणि चिपळूण तालुक्यात गोवंश हत्त्येचे प्रकार घडत असतानाच गुरूवारी रात्री सावर्डे पोलिसांनी वहाळ फाटा येथे बैलांची वाहतूक करणारा आयशर टेम्पो ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गाडीमध्ये एकूण १७ बैल असून, याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.गतवर्षी २६ जानेवारी रोजी खेड - लोटे येथे गोवंश हत्येची घटना घडली होती. या घटनेला वर्ष पूर्ण होत असतानाच चिपळूण तालुक्यातील कामथे - हरेकरवाडी स्टॉपजवळ गोवंश हत्या झाल्याची घटना घडली होती. ज्याठिकाणी हत्या झाली त्याठिकाणी बाजूलाच पावट्याची शेती असून, शेतकरी रवींद्र उदेग हे शेतीला पाणी देण्यासाठी गेले असता ही घटना त्यांच्या निदर्शनास आली.ही घटना समजताच याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या घटनेचा तपास सुरू असतानाच २१ जानेवारी रोजी सकाळी चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथे कापलेल्या जनावरांचे अवशेष सापडल्याने खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याठिकाणी कापलेल्या जनावरांच्या अवशेषाबरोबरच रक्ताचा सडाही पडलेला होता. घटनास्थळावरून पोलिसांना एक दोरखंड सापडला असून, हा दोरखंड जप्त करण्यात आला आहे.लोटे, कामथे येथील घटनेनंतर पिंपळी येथे जनावरांचे अवशेष सापडल्याने गोवंश हत्त्येचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत होती. याबाबत ग्रामस्थांनी बैठक घेऊन घटनेचा निषेधही केला होता. तर पोलिसांनी याप्रकरणानंतर गुहागर, चिपळूण मार्गावर बंदोबस्त वाढवला होता. तसेच गस्तीतही वाढ करून वाहनांची कसून चौकशी करण्यात येत होती.मुंबई - गोवा महामार्गावरील सावर्डे हद्दीतील वहाळ फाटा येथे जनावरांची वाहतूक करणारा आयशर टेम्पो सावर्डे पोलिसांनी गुरूवारी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या दरम्याने ताब्यात घेतला आहे. खेड ते कराडच्या दिशेने ही जनावरे घेऊन जात असताना कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :cow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचारRatnagiriरत्नागिरी