भाट्ये येथे गांजासह एकजण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:31 IST2021-09-11T04:31:09+5:302021-09-11T04:31:09+5:30
रत्नागिरी : शहरानजीकच्या भाट्ये पुलाच्या कॉर्नरवर शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून सुमारे ४८ हजार रुपयांच्या गांजासह एकाला ताब्यात घेतले. ...

भाट्ये येथे गांजासह एकजण ताब्यात
रत्नागिरी : शहरानजीकच्या भाट्ये पुलाच्या कॉर्नरवर शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून सुमारे ४८ हजार रुपयांच्या गांजासह एकाला ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी रात्री ९ वाजण्याचा सुमारास करण्यात आली. राज लक्ष्मण मंजलकर (रा. भाट्ये, रत्नागिरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पोलिसांच्या पथकाला भाट्ये पुलाजवळ एकजण गांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार शहर पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकून राज मंजलकर याच्याकडून ४७,९२० रुपयांचा गांजा व इतर साहित्य जप्त केले.
ही कारवाई शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक विजय जाधव, लेखनिक कारकून सहायक पोलीस फौजदार लक्ष्मण हरचकर, पोलीस हेडकाॅन्स्टेबल जयवंत बगड, पोलीस नाईक प्रवीण बर्गे, गणेश सावंत, प्रवीण पाटील, वैभव नार्वेकर, विशाल आलीम यांनी केली.