शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

सावित्री नदीवरील आंबेत-म्हाप्रळ पूल कोसळण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 16:41 IST

रायगड जिल्ह्यातील  सावित्री नदीवरील 2 ऑगस्ट 2016 रोजी मुंबई-गोवा महामार्गावरील महाड सावित्री नदीवरील ब्रिटिश कालीन पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत  40 निष्पाप  लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता , याच सावित्री नदीवरील आणखी एक  आंबेत - म्हाप्रळ पूल कोसळण्याच्या मार्गावर आहे.

-  शिवाजी गोरे रत्नागिरी - रायगड जिल्ह्यातील  सावित्री नदीवरील 2 ऑगस्ट 2016 रोजी मुंबई-गोवा महामार्गावरील महाड सावित्री नदीवरील ब्रिटिश कालीन पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत  40 निष्पाप  लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता , याच सावित्री नदीवरील आणखी एक  आंबेत - म्हाप्रळ पूल कोसळण्याच्या मार्गावर आहे.

महाड सावित्री नदीवरील दुर्घटनेनंतर याच  सावित्री  नदीवरील  आंबेत म्हाप्रळ नावाचा आणखी एक पूल  धोकादायक बनला असून ,  हा पूल वाहतूकीस कमकुवत बनला असून, कोसळण्याच्या मार्गावर आहे . महाड दुर्घटनेनंतर या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट होऊन पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती  आंबेत पुलाचे काम  6 महिन्या पूर्वीच पूर्ण झाले होते , सुमारे  12 कोटी रुपये खर्चून दुरुस्ती करण्यात आली  आहे. तरीही   पूल एका बाजूला झुकला आहे ,तसेच पुलाचा एक पिलर सरकल्याने सावित्री नदीवरील आंबेत - महाप्रळ पुलाला धोका निर्माण झाला आहे  , कमकुवत झालेला  पूल कधीही कोसळू शकतो, असा दावा केला जात आहे ,या पुलावरून अवजड वाहतुक बंद करण्यात आली  आहे .  रायगड रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा व मुंबईसाठी जवळचा पर्यायी मार्ग म्हणून महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांचे कारकीर्द पुलाला मंजुरी मिळाली , रायगड आंबेत व रत्नागिरी  म्हाप्रळ सावित्री नदीवर बांधण्यात आला .या पुलामुळे मुबंई चे अंतर कमी होऊन दोन्ही जिल्ह्यातील दळणवळणाची  सोय झाली , विशेष म्हणजे 6 महिन्यापूर्वीच  12 कोटी रुपये खर्च  करून दुरुस्ती करण्यात आली होती . परंतु हा पूल वाहतुकीला कमकुवत बनल्याने शासनाचे कोटयवधी रुपये गेले कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाड सावित्री नदीवर या पूर्वी दुर्दैवी घटना घडून अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले होते , आशा प्रकारची घटना टाळण्यासाठी आंबेत - म्हाप्रळ पूल वाहतुकीला बंद करण्यात आला आहे ,  तज्ञ मंडळीकडून या पुलाचा सर्वे करण्यात आला असून हा पूल अतिशय धोकादायक बनला आहे वाहने पेलण्याची क्षमता शिल्लक राहिली नाही त्यामुळे या पुलाचा पुनर सर्वे करून दुरुस्ती केली जाईल तसेच पर्यायी पूल सुद्धा उपलब्ध व्हावा यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे खासदार सुनील तटकरे म्हणालेतय सावित्री नदीवरील  आंबेत पुलाची पाहणी  केल्यानंतर  हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे तज्ञ मंडळीच्या लक्षात आले आहे , पुलाचा दोन नंबरचा पिलर भरती ओहोटीच्या वेळी दोन इंच ते 4 इंच सरकत असल्याचे सर्व्हेतुन समोर आले आहे ,त्यामुळे पूल कधीही कोसळू शकतो अस बोललं जातं आहे. 

आंबेत -म्हाप्रळ ब्रिज खाली सक्शन पंपाद्वारे  बेकायदेशीर उत्खनन करण्यात आल्याने पिलर चा सपोर्ट कमी झाला आहे, तसेच एक पिलर भरती ओहोटीच्या वेळी जागा सोडत असून, किंचित हालत आहे ,  संपूर्ण ब्रिज कधीही पडू शकतो  , वारंवार तक्रारी करून सुध्दा दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे

सावित्री नदीवरील धोकादायक बनलेला पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला असल्याने इतर वाहतूकदार प्रमाणेच स्थानिक स्थानिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे तसेच लांबच्या मार्गाने वाहने घेऊन जावे लागत आहे त्यामुळे अंतर वेळ वाढले आहे तर दोन्ही जिल्ह्यातील दळणवळण ठप्प झाल्याने स्थानिकांची मोठी गैरसोय सुरू आहे.

सावित्री नदीवरील पूल कोसळून अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले होते , या नदीवरील  376 मीटर लांबीचा आंबेत -म्हाप्रळ पूल कोसळण्याच्या  मार्गावर आहे . लोकांच्या जिवीताचा धोका लक्षात  घेऊन या पुलाची दुरुस्ती होणे गरजेचे आहे

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी