मुंबई-गोवा महामार्गावर निवळीनजीक रस्ता खचला, एका बाजूने वाहतूक सुरू 

By मनोज मुळ्ये | Published: June 29, 2023 10:48 AM2023-06-29T10:48:29+5:302023-06-29T10:54:05+5:30

बुधवारी पहाटेपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला.

On the Mumbai-Goa highway, the road near Nivlin is blocked, traffic is moving from one side | मुंबई-गोवा महामार्गावर निवळीनजीक रस्ता खचला, एका बाजूने वाहतूक सुरू 

मुंबई-गोवा महामार्गावर निवळीनजीक रस्ता खचला, एका बाजूने वाहतूक सुरू 

googlenewsNext

रत्नागिरी : पहिल्याच मुसळधार पावसाने मुंबई गोवा महामार्गाला दणका दिला आहे. रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा ते निवळी यादरम्यान चौपदरीकरणाचे काम सुरू असलेला रस्ता खचला आहे. सद्यस्थितीत एका बाजूने वाहतूक सुरू असली तरी वेळीच उपाययोजना न केल्यास पूर्ण महामार्ग टप्प होण्याची भीती आहे. बुधवारी पहाटेपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. 

बुधवारी दिवसभर पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे हातखंबा ते निवळी यादरम्यान चा रस्ता खचला आहे. महामार्ग चौपदरीकरणामध्ये रत्नागिरी तालुक्याच्या हद्दीतील काम आधीच बराच काळ रखडले आहे. आता या कामाने गती घेतली आहे. मात्र बुधवारच्या मुसळधार पावसाने चौपदरीकरणासाठी टाकलेला भरावा खचला आणि त्यामुळे रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे.

सध्या एका बाजूने वाहतूक सुरू आहे. मात्र मातीचा भराव खचणे न थांबवल्यास आणि पुन्हा मुसळधार पाऊस पडल्यास रस्ता आणखी खचण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर महामार्गावरील पूर्ण वाहतूक ठप्प होण्याची भीती आहे. बुधवारी रात्रीपासूनच रस्ता खचण्यास सुरुवात झाली होती. मात्र दुरुस्तीचे काम गुरुवारी सकाळी सुरू झाले आहे.

Web Title: On the Mumbai-Goa highway, the road near Nivlin is blocked, traffic is moving from one side

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.