शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी पहाटला तरुणांनी घेतला कातळशिल्प, पाणवटे, आडवाटांवरील देवतांचा शोध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 12:26 IST

कातळ म्हणजे पाण्याचे दुर्भिक्ष्य. असे असताना गुराख्यांना, जनावरांना बारा महिने पाणी पुरविणाऱ्या पाण्याच्या दगडी टाक्यांना यावेळी भेट देण्यात आली.

रत्नागिरी : खरेतर दिवाळी पहाटेला शहरी संस्कृतीत गाण्यांच्या मैफिली आयोजित केल्या जातात, मात्र सड्ये गावातील शालेय मुले, तरुणांनी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सड्यावर पदयात्रा काढून प्राचीन कातळशिल्प, रखरखीत कातळावरील बाराही महिने पाणी देणारे पाणवटे, आडवाटांवरील दुर्गम देवतांचा शोध घेतला. यावेळी कातळशिल्पांचे संवर्धन व्हावे, या हेतूने त्यांना संरक्षण व रेखाचित्रणही करण्यात आले.सड्ये गावातील मुले, तरुणांनी ही पदयात्रा पार पडली. गावातील ज्येष्ठ नागरिक दत्ताराम खवळे आणि अनंत धुमक यांनी या पदयात्रेच्या आडवाटांचे मार्गदर्शन केले. सुरुवातीला माचाण या ठिकाणी भेट देण्यात आली. त्यानंतर सोमेश्वर देवस्थानच्या देवराईला भेट देण्यात आली. गुराख्यांचे अर्थात जांगल्यांचे देवस्थान असलेल्या जांगलदेव याठिकाणी भेट देण्यात आली. कातळ म्हणजे पाण्याचे दुर्भिक्ष्य. असे असताना गुराख्यांना, जनावरांना बारा महिने पाणी पुरविणाऱ्या पाण्याच्या दगडी टाक्यांना यावेळी भेट देण्यात आली. रखरखित उन्हातल्या या टाक्यांमध्ये आजही बारा महिने थंडगार पाणी टिकून असल्याचे दिसले.कातळशिल्प हा कोकणच्या संस्कृतीचा अनमोल ठेवा. सड्ये-पिरंदवणेच्या सड्यावरिल कातळशिल्प शोधण्याचा यावेळी मुलांनी प्रयत्न केला. यावेळी ‘भेकर’ हा प्राणी आणि ‘माणूस’ ही दोन कातळशिल्पे सड्यावरील कातळात आढळली. मुलांनी त्यावरील माती, रान काढून साफ केली व त्यांच्या रेखांना रंगकाम करुन ती सुस्पष्ट केली. तसेच त्यांचे संवर्धन व्हावे, याकरिता त्यांना दगडी संरक्षण केले.त्यानंतर कोकणातील प्रमुख मातृदेवता श्री भराडीण क्षेत्राला भेट देण्यात आली. याठिकाणच्या कातळावर असलेल्या ३५ फूट लांब असलेल्या आडालाही भेट देण्यात आली. याही आडात बाराही महिने पाणी असते. भराडणीची घाटी उतरुन टोळवाड परिसरातील पेशववकालीन उजव्या सोंडेचे माेरेश्वर देवस्थान तसेच भावे आडम गावचे देवस्थान श्री सप्तेश्वर या देवस्थानाला भेट देण्यात आली. याचठिकाणी क्षेत्रदेवता म्हणून वसलेल्या जाखमाता देवस्थानाला भेट देण्यात आली.त्यानंतर या यात्रेची सांगता करण्यात आली. अनंत धुमक, मारुती धुमक, अमोल पालये यांनी या पदयात्रेचे आयोजन केले होते. या पदयात्रेत हितेश नार्वेकर, सुरज माने, गुरुनाथ धुमक, रोशनी पालये यांच्यासह शालेय विद्यार्थी, तरुण सहभागी झाले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी