‘काव्याभिवाचन’ स्पर्धेत ओंकार पवार प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:32 IST2021-09-03T04:32:09+5:302021-09-03T04:32:09+5:30
रत्नागिरी : येथील भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालयात मराठी विभागाकडून कला, वाणिज्य, विज्ञान या तिन्ही शाखांकरिता व्हिडीओ माध्यमातून ...

‘काव्याभिवाचन’ स्पर्धेत ओंकार पवार प्रथम
रत्नागिरी : येथील भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालयात मराठी विभागाकडून कला, वाणिज्य, विज्ञान या तिन्ही शाखांकरिता व्हिडीओ माध्यमातून ‘काव्याभिवाचन स्पर्धा’ घेण्यात आली. यात ओंकार विष्णू पवार (विज्ञान शाखा) याने प्रथम क्रमांक पटकावला.
‘श्रावणाचा उल्लेख असणारी कोणत्याही कवीची कविता’ असा विषय स्पर्धेसाठी देण्यात आला होता. वैष्णवी संजय बाणे (कला शाखा), सेजल किशोर मडके (कला शाखा) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवले. हेमांगी विलास गोताड (वाणिज्य शाखा) हिला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.
सुस्पष्ट आवाज, शब्दाभिव्यक्ती, अर्थछटा आदी निकषांवर परीक्षण करण्यात आले. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. दृकश्राव्याचे साजेसे तंत्र (मंद धून, शब्द चित्रीकरण) वापरून काव्याभिवाचन पद्धतीमध्ये उत्तम वातावरण निर्मितीने सादरीकरण केले गेले. या स्पर्धेचे आयोजन व परीक्षण मराठी विभागप्रमुख अनन्या धुंदूर यांनी केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, प्रभारी प्राचार्य मधुरा पाटील, उपप्राचार्य वसुंधरा जाधव, मराठी विभागप्रमुख अनन्या धुंदूर, अन्य शिक्षक, कर्मचारी यांनी अभिनंदन केले.