शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांचा विणीचा हंगाम लांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 16:53 IST

Olive Ridley turtles wildlife Ratnagiri- हिवाळा सुरू झाला की, कोकणातील अनेक किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे अंडी घालण्यासाठी येतात. साधारणपणे नोव्हेंबरपासून या हंगामाला सुरुवात होते. मात्र, यावर्षी निसर्ग वादळ, सलग दोनवेळा समुद्राच्या पश्चिम-उत्तर क्षेत्रात निर्माण झालेले कमीदाबाचे पट्टे यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही किनारपट्टीवर कासव अंडी घालण्यासाठी आलेले नाहीत. यावर्षी ऑलिव्ह रिडले विणीचा हंगाम लांबला आहे.

ठळक मुद्देऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांचा विणीचा हंगाम लांबला

मंदार गोयथळेअसगोली : हिवाळा सुरू झाला की, कोकणातील अनेक किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे अंडी घालण्यासाठी येतात. साधारणपणे नोव्हेंबरपासून या हंगामाला सुरुवात होते. मात्र, यावर्षी निसर्ग वादळ, सलग दोनवेळा समुद्राच्या पश्चिम-उत्तर क्षेत्रात निर्माण झालेले कमीदाबाचे पट्टे यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही किनारपट्टीवर कासव अंडी घालण्यासाठी आलेले नाहीत. यावर्षी ऑलिव्ह रिडले विणीचा हंगाम लांबला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील वेळास, दापोली तालुक्यातील आंजर्ले, कोळथरे, केळशी, कद्रे, लाडघर, पाडले, मुरुड, दाभोळ, गुहागर तालुक्यातील गुहागर आणि तवसाळ, रत्नागिरी तालुक्यातील गावखडी आणि राजापूर तालुक्यातील माडबन व वाडावेत्ये या १४ गावांतील समुद्र किनाऱ्यांवर वन विभागामार्फत ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन मोहीम राबवली जाते.२०१९-२०२० या कालावधित रत्नागिरी जिल्ह्यातील किनाऱ्यांवर ६५२ घरट्यातील ६५८५३ अंडी वन विभागाने संरक्षित केली होती. त्यापैकी ३२४३३ अंड्यातून बाहेर पडलेल्या कासवांना सुरक्षितरित्या समुद्रात सोडण्यात वन विभागाला यश आले. यावर्षीही वन विभागाने जिह्यात कासव संवर्धन मोहिमेची तयारी नोव्हेंबर महिन्यापासून सुरू केली. परंतु, डिसेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यातील १४ किनाऱ्यांपैकी एकाही किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीचे कासव अंडी घालण्यासाठी आलेले नाहीत.याबाबत बोलताना ऑलिव्ह रिडले जीवनचक्र अभ्यासक माधव मुधोळ म्हणाले की, मुळात गेल्या तीन-चार वर्षांचा अभ्यास केला, तर अंडी देण्याचा कालावधी पुढे सरकत असल्याचे लक्षात येत आहे. ग्लोबल वॉर्मिंग हे त्याचे सामान्य कारण असल्याचे ते म्हणाले. बदलत्या वातावरणामुळे पक्षी-प्राण्यांच्या आयुष्यावर खूप मोठे परिणाम होत आहेत, हेच यातून दिसत आहे.हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर सापडली अंडीनाताळच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र हरिहरेश्वर येथील समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाचे घरटे वन विभागाला सापडले आहे. या घरट्यातून १३८ अंडी संरक्षित करण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवर या हंगामात सापडलेले हे पहिले घरटे आहे. जानेवारी महिन्यापासून कोकण किनारपट्टीवर विणीचा हंगाम सुरू होईल, असा अंदाज आहे.

निसर्ग वादळामुळे समुद्रही ढवळून निघाला. त्यानंतरही पश्चिम उत्तर समुद्रात दोनवेळा चक्रीवादळ झाले. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे थंडी उशिरा पडली. डिसेंबर महिन्यात पाऊस पडला. या सर्वांचा परिणाम कासवांच्या जीवनचक्रावरही झाला आहे. ती इतस्तत: विखुरली गेल्याने त्यांच्या मीलनाचा काळ लांबला. स्वाभाविकच अंडी घालण्याचा काळही लांबला आहे. जानेवारीत विणीचा हंगाम सुरू होईल.- माधव मुधोळ, अभ्यासक

टॅग्स :wildlifeवन्यजीवRatnagiriरत्नागिरी