शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
5
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
6
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
7
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
8
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
9
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
10
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
11
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
12
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
13
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
14
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
15
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
16
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
17
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
18
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग
19
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
20
Social Viral: बीडच्या ZP शाळेचा पॅटर्न: मधल्या सुट्टीत सुलेखन आणि रंगोळीचे प्रशिक्षण, सरपंचांचेही पाठबळ!

घरात घुसलेल्या बिबट्यापासून वृद्धाने वाचवले अख्खे कुटुंब!, रत्नागिरी जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 13:20 IST

साखरपा : बिबट्याच्या रूपात काळ समोर आला होता; पण ६५ वर्षीय वृद्धाने प्रसंगावधान राखले आणि आपल्या ९५ वर्षांच्या वडिलांसह ...

साखरपा : बिबट्याच्या रूपात काळ समोर आला होता; पण ६५ वर्षीय वृद्धाने प्रसंगावधान राखले आणि आपल्या ९५ वर्षांच्या वडिलांसह घरातील सर्वांचे प्राण वाचवले. काळजाचा थरकाप उडवणारा हा प्रसंग प्रत्यक्षात घडला आहे संगमेश्वर तालुक्यातील किरबेट ओझरवाडीत. अशोक गंगाराम रवंदे यांनी घरात घुसलेल्या बिबट्याच्या तावडीतून अख्खे कुटुंब वाचवले आहे.किरबेट ओझरवाडीत राहणारे अशोक रवंदे बुधवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घराबाहेर गेले. नेमका त्याचवेळी कुत्र्याच्या शिकारीसाठी बिबट्या घरात शिरला. रवंदे पुन्हा घरात आले आणि त्यांनी दरवाजा बंद केला. मात्र, घरातील कुत्र्याचा आवाज आल्याने त्यांनी घरातील दिवे सुरू केले. त्यावेळी बिबट्याने कुत्र्यावर झडप घातली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.मात्र, घराचे सर्व दरवाजे बंद असल्याने बिबट्याला घरातून बाहेर पडता येत नव्हते. त्यावेळी घरात अशोक रवंदे यांचे ९५ वर्षांचे वडील गंगाराम सीताराम रवंदे, सुंदराबाई रामचंद्र रवंदे (वय ६०), अशोक यांची पत्नी शेवंती रवंदे (वय ५५), अशी माणसे होती. यावेळी काय करायचे ते कोणालाच सूचत नव्हते.हा सारा प्रकार अर्धा तास सुरू होता. बिबट्याने कुत्र्याला पकडले होते. अशोक रवंदे यांनी धाडस करून दरवाजापर्यंत गेले. त्यांनी दरवाजा उघडला आणि ते पाहून बिबट्याने तेथून धूम ठोकली. अशोक यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबतची माहिती पोलिस पाटील प्रदीप अडबल यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन रवंदे यांच्या कुटुंबाची विचारपूस केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri Man Saves Family from Leopard Attack: A Brave Tale

Web Summary : A 65-year-old man in Ratnagiri bravely saved his family, including his 95-year-old father, from a leopard that entered their home. Ashok Ravande's quick thinking and courage averted a potential tragedy when he opened the door, scaring the leopard away after it attacked their dog.