खेडमध्ये रुग्णांची संख्या ४ हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:39 IST2021-06-09T04:39:17+5:302021-06-09T04:39:17+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क खेड : तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्येने चार हजारचा टप्पा ओलांडला असून, आतापर्यंतची रुग्णांची संख्या ४ हजार २७१ ...

The number of patients in Khed has crossed 4,000 | खेडमध्ये रुग्णांची संख्या ४ हजार पार

खेडमध्ये रुग्णांची संख्या ४ हजार पार

लाेकमत न्यूज नेटवर्क

खेड : तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्येने चार हजारचा टप्पा ओलांडला असून, आतापर्यंतची रुग्णांची संख्या ४ हजार २७१ इतकी झाली आहे. सद्यस्थितीत ३१३ रुग्ण सक्रिय असून, आतापर्यंत ३७८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तालुक्यातील एकूण कोरोना बळींची संख्या १७१ वर पोहोचली आहे. कोरोना रुग्णांचा मृत्युदर ४.०५ टक्के एवढा आहे.

दरम्यान, रविवारी प्राप्त अहवालानुसार

तालुक्यात एकूण २९ नवे रुग्ण सापडले असून, शिव येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यातील २ शहरातील तर ग्रामीण भागातील २७ जणांचा समावेश आहे. तर ग्रामीण भागात सापडलेल्या २७ रुग्णांमध्ये सर्वाधिक देवघर ९, आवाशी, ऐनवरे व पटवर्धन लोटे येथील प्रत्येकी ३, घाणेखूट, लवेल व भरणे प्रत्येकी २, आयनी, मुसाड, तिसे शिगवणवाडी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजन शेळके यांनी दिली आहे.

Web Title: The number of patients in Khed has crossed 4,000