आता वेतन आॅनलाईन
By Admin | Updated: October 4, 2014 23:35 IST2014-10-04T23:35:24+5:302014-10-04T23:35:24+5:30
अध्यापकांना दिलासा : अध्यापक संघाकडून पाठपुरावार

आता वेतन आॅनलाईन
रत्नागिरी : सरळसेवेतील शिक्षकांबरोबर अतिरिक्त शिक्षकांचे वेतन आॅनलाईन काढण्यात येणार आहे. अतिरिक्त शिक्षकांचे वेतन न थांबविता ते काढण्याची मागणी करण्यात आली होती. त्यास मंजुरी देत वेतन आॅनलाईन काढण्याच्या सूचना देण्यात आल्याने अध्यापकवर्गास दिलासा मिळाला आहे.
आरटीई कायद्यानुसार ३० सप्टेंबरच्या दिवशी पटसंख्येनुसार शाळेतील शिक्षक-कर्मचारी संच निश्चिती होेते. २०१३-१४ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता गेल्यावर्षी ३० सप्टेंबर १३ च्या पटसंख्येनुसार गेल्याचवर्षी होऊन त्यानुसार अंमलबजावणी होणे आवश्यक होते. त्यामुळे सर्वत्र शिक्षक-कर्मचारी सेवेत कार्यरत राहिले. नियमानुसार त्यांना वेतन देण्यात आले. शिक्षणसेवकांना तत्पूर्वीच शिक्षणाधिकाऱ्यांकडून तीन वर्षाची मान्यताही देण्यात आली आहे. अशा बहुतांश शिक्षणसेवकांच्या तीन वर्षाच्या सेवा गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण झाल्याने कायम शिक्षक ठरतात. अशावेळी गेल्यावर्षी तीन वर्षे पूर्ण झाली नाहीत, म्हणून त्यावर्षी म्हणजे ३० सप्टेंबर १४ च्या पटसंख्येनुसार संचमान्यता करावी व त्यानंतरच याबाबतची कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अतिरिक्त शिक्षकांची नावे शाळांना त्वरीत कळविण्याचे आवाहन करण्यात आले होते. अतिरिक्त शिक्षकांचे वेतन काढू नये, अशा सेचना देखील करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिक्षकवर्गात नाराजी निर्माण झाली होती. आरटीई कायद्यानुसार शिक्षकांची शैक्षणिक पात्रता व माध्यमिक शाळा संहिता १९८१ मधील अतिरिक्त शिक्षक ठरविण्याबाबतीत प्रश्न निर्माण झाले आहेत.
ऐन दिवाळी व सणासुदीच्या कालावधीत वेतन थांबविल्यामुळे शिक्षकांचे नुकसान होणार आहे. अतिरिक्त शिक्षकांचे सावेशन व शिक्षणसेवकांच्या सेवा याबबातीत चालू शैक्षणिक वर्षाच्या संचमान्यतेनंतरच कार्यवाही व्हावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघातर्फे करण्यात आली आहे.
गतवर्षी(२०१३-१४) या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता यावर्षी आॅगस्टमध्ये करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी करून अतिरिक्त शिक्षकांची नावे कळवावीत तसेच गेल्यावर्षी ज्या शिक्षणसेवकांचा तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला नाही, त्यांच्या सेवा समाप्त करण्याबाबत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. अतिरिक्त ठरविण्याच्या निकषातील संदिग्धतेमुळे नेमके अतिरिक्त कोणाला ठरवावे, हा संभ्रम निर्माण झाला.
अध्यापक संघाच्या पाठपुराव्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे या महिन्याचे वेतन आॅनलाईन काढावे, अशा सूचना करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
४सरळसेवेतील अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाचा निर्माण झाला होता प्रश्न
४संचमान्यतेनुसार अंमलबजावणी आवश्यक
४दिवाळीत निर्माण होणार होता वेतनाचा प्रश्न
४यंदाच्या संचमान्यतेनुसार कार्यवाही करण्याची मागणी
४१९८१ चे प्रश्न तसेच अतिरिक्त शिक्षांबाबत संदिग्धता
४शिक्षकांचे वेतन आॅनलाईन काढण्याची मागणी मान्य झाल्याने अतिरिक्त शिक्षकांमध्ये समाधान
४गतवर्षीची संचमान्यता यंदा झाली होती आॅगस्टमध्ये
४शिक्षणाधिकाऱ्यांकडून मान्यता
४अतिरिक्तचा नेमकेपणा
४अध्यापक संघाने केला होता पाठपुरावा
४पुढील अंमलबजावणीकडे लक्ष