किल्ले कोळकेवाडी येथे सूचना फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:37 AM2021-09-09T04:37:34+5:302021-09-09T04:37:34+5:30

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा सह्याद्री प्रतिष्ठानच्या चिपळूण तालुका विभागातर्फे किल्ले कोळकेवाडी येथे सूचना फलक व दिशादर्शक फलक लावण्यात आले ...

Notice board at Fort Kolkewadi | किल्ले कोळकेवाडी येथे सूचना फलक

किल्ले कोळकेवाडी येथे सूचना फलक

googlenewsNext

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा सह्याद्री प्रतिष्ठानच्या चिपळूण तालुका विभागातर्फे किल्ले कोळकेवाडी येथे सूचना फलक व दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत.

सह्याद्री प्रतिष्ठानच्या चिपळूण विभागातर्फे सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तालुक्यातील कोळकेवाडीतील घनदाट वन परिक्षेत्रातील किल्ल्यावर जाणे शिवप्रेमींना सोईस्कर व्हावे, यासाठी दिशादर्शक फलक व सूचना फलक लावण्याची आवश्यकता होती. दुर्गप्रेमी व पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत.

या मोहिमेत सागर शिर्के, आकाश मणचेकर, पार्थ पटवर्धन, गुरू पवार, सागर घाग, तुषार चव्हाण, यशवंत शिंदे, ओंकार मोरे, सोहम साळवी, वैभव बगडे, आशिष मोहरेकर, निशांत पाकटे, ओंकार कुलकर्णी, साहिल आंबेकर, निनाद सुर्वे आणि दिवेश भोंबल सहभागी झाले होते. दुर्गसेवकांच्या या उपक्रमाबद्दल परिसरातील ग्रामस्थ व दुर्गप्रेमींकडून काैतुक करण्यात येत आहे.

Web Title: Notice board at Fort Kolkewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.