६२ वर्षात आरक्षणच नाही --आता बहिष्कार टाकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 05:46 PM2020-02-12T17:46:44+5:302020-02-12T17:47:54+5:30

चिपळूण तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका होणार असून, त्यासाठी प्रभाग रचना व आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यावर प्रशासनाकडून हरकती मागविण्यात आल्या असून, कापसाळ ग्रामपंचायतीतील बौद्धवाडी येथील ग्रामस्थांनी हरकत अर्ज दाखल केला आहे. या अर्जामध्ये त्यांनी या देशातील व्यवस्थेने शोषित, पीडित बहुजनांच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय हक्क आणि अधिकारांपासून हजारो वर्षे वंचित ठेवले होते.

No reservation in 5 years | ६२ वर्षात आरक्षणच नाही --आता बहिष्कार टाकणार

असे निवेदन तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना देण्यात आले आहे. यावेळी बौद्धजन हितसंरक्षण समितीचे रमण मोहिते, सुभाष मोहिते, सचिव रुपेश हळदे, राहुल कांबळे, माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा रेवती मोहिते व अन्य सदस्या उपस्थित होत्या.

Next
ठळक मुद्दे- कापसाळ ग्रामपंचायत- आरक्षण न मिळाल्यास बहिष्कार टाकणार

चिपळूण :  सध्या अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणावरून सर्वत्र ओरड होत असतानाच कापसाळ येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बौद्धवाडीने हरकत दाखल केली आहे. या ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून ६२ वर्षांत अनुसूचित जाती-जमातीला येथे आरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे या पंचवार्षिक निवडणुकीत अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण न मिळाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

चिपळूण तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका होणार असून, त्यासाठी प्रभाग रचना व आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यावर प्रशासनाकडून हरकती मागविण्यात आल्या असून, कापसाळ ग्रामपंचायतीतील बौद्धवाडी येथील ग्रामस्थांनी हरकत अर्ज दाखल केला आहे. या अर्जामध्ये त्यांनी या देशातील व्यवस्थेने शोषित, पीडित बहुजनांच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय हक्क आणि अधिकारांपासून हजारो वर्षे वंचित ठेवले होते. या बहुजन समाजाची उन्नती व्हावी, त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यादृष्टीने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून हक्क, अधिकार मिळवून दिले. मात्र, आज २१ व्या शतकातदेखील बहुजन समाजातील प्रामुख्याने अनुसूचित जातीतील बौद्ध समाजाला त्यांच्या राजकीय हक्क आणि अधिकारांपासून वंचित राहावे लागत आहे.

सन १९५८मध्ये कापसाळ ग्रामपंचायतीच्या स्थापना झाली. तेव्हापासून आजतागायत सरपंच, उपसरपंच या प्रमुख पदांसह ग्रामपंचायत सदस्य पददेखील अनुसूचित जाती-जमातीतील बौद्ध समाजाला मिळालेले नाही. कापसाळ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात या समाजाची लोकसंख्या जवळपास २०० ते २५०च्या दरम्यान असूनही अनुसूचित जातीसाठी आरक्षण पडत नसेल तर ते दुर्दैव आहे. यावर्षी होणाऱ्या निवडणुकीत आरक्षण न मिळाल्यास बौद्ध समाज या निवडणुकीवर बहिष्कार टाकेल, असे निवेदन तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना देण्यात आले आहे. यावेळी बौद्धजन हितसंरक्षण समितीचे रमण मोहिते, सुभाष मोहिते, सचिव रुपेश हळदे, राहुल कांबळे, माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा रेवती मोहिते व अन्य सदस्या उपस्थित होत्या.

 

Web Title: No reservation in 5 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.