ना ढोल, ना ताशा फक्त ‘मोरया’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:32 IST2021-09-11T04:32:13+5:302021-09-11T04:32:13+5:30

रत्नागिरी : पावसाने घेतलेल्या उघडीपमुळे गणेशभक्तांनी उत्साहाने आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या घरी नेले. काेराेनाच्या निर्बंधांमुळे नियमांचे पालन करत ढाेल, ...

No drums, no Tasha, just 'Moraya' | ना ढोल, ना ताशा फक्त ‘मोरया’

ना ढोल, ना ताशा फक्त ‘मोरया’

रत्नागिरी : पावसाने घेतलेल्या उघडीपमुळे गणेशभक्तांनी उत्साहाने आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या घरी नेले. काेराेनाच्या निर्बंधांमुळे नियमांचे पालन करत ढाेल, ताशे, बँजाे, मिरवणुका आणि गुलालाला फाटा देत गणेशमूर्ती नेण्यात आली. काेराेनाची भीती असली तरी गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण हाेते. त्यामुळे ‘गणपती बाप्पा माेरया’चा जयघाेष करत बाप्पाला आपल्या घरी नेले. जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ५३९ खासगी आणि १०८ सार्वजनिक बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

पावसाने दोन दिवस उघडीप घेतल्याने गणेशभक्तांनी समाधान व्यक्त केले आहे. सकाळी ढगाळ वातावरणामुळे डोक्यावरून, हातगाडी, चारचाकी, तीनचाकी, टेम्पो, ट्रक या वाहनातून गणेशमूर्ती प्लास्टिक कागद टाकूनच नेणे अनेकांनी पसंत केले. शहर तसेच ग्रामीण भागातील रस्ते निकृष्ट असल्याने गणेशमूर्ती घेऊन भक्तांना संथगतीने प्रवास करावा लागत होता. सोशल डिस्टन्सिंगमुळे गणेशमूर्ती नेण्यासाठी मूर्तिकारांनी भाविकांना वेळ निश्चित करून दिली होती. त्यानुसार भाविकांनी गणेशमूर्ती घरी आणल्या. अत्यंत शांत व साधेपणाने उत्सवाची सुरुवात झाली असली तरी भाविकांचा उत्साह मात्र कायम आहे.

उत्सव कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सर्वत्र बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शनिवार दि.११ सप्टेंबर रोजी दीड दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन होणार आहे. गर्दी टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठिकठिकाणी कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यात दहा हजार ४४६ घरगुती व १६ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असून, घराशेजारीच गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

---------------------

ऑनलाईन पूजा

कोरोनामुळे भटजींनीही प्राणप्रतिष्ठापना पूजा ऑनलाईन सांगितली. गणेशमूर्ती आणण्यासाठी नव्हे तर आरती करतानाही भक्तांनी मास्क परिधान केले होते. घरोघरी यजमान मंडळींनीच पूजा, आरती व अन्य धार्मिक कार्यक्रम उरकले. काही भक्त दीड दिवसांचे गणपती आणत असल्याने ठिकठिकाणी सायंकाळी श्री सत्यनारायण महापूजेचे आयाेजन केले हाेते; मात्र कोरोनामुळे भटजींनीही पूजाही ऑनलाईनच सांगितली.

--------------------

खड्ड्यांचे विघ्न कायम

गणेशाेत्सवापूर्वी रत्नागिरी शहरातील सर्व खड्डे भरण्यात येतील, असे नगर परिषदेने दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. शहरातील अनेक भागात खड्डे तसेच असल्याने गणेशभक्तांना मूर्ती नेताना त्रास सहन करावा लागला. शहराबराेबरच ग्रामीण भागातील रस्तेही खड्डेमय झालेले असून, त्यांची दुरुस्ती न केल्याने मूर्ती नेताना गणेशभक्तांचे हाल झाले. मुंबई - गाेवा महामार्गाचे रडतखडत सुरू असलेले चाैपदरीकरणाचे काम आणि खड्डे यामुळे गावी येणाऱ्या गणेशभक्तांचे हाल झाले.

Web Title: No drums, no Tasha, just 'Moraya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.