शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आंबा बागायतदारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत ठोस निर्णय नाही, रत्नागिरीत धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 14:03 IST

अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान

रत्नागिरी : जिल्ह्यात आंबा बागायतदारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत वेळोवेळी आंदोलने, निवेदने देऊनही अद्याप ठोस कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शुक्रवारी आंबा बागायतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना सादर करण्यात आले.सन २०१५ पासून थकीत कर्ज असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या ११,३२६ असून, थकबाकीची रक्कम २२३.८६ कोटी आहे. अशा शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आंबा, काजू बागायतदारांची संपूर्ण कर्जाची सरसकट माफी करून सातबारा कोरा करत त्यांना व्यवसायात उभे राहण्यासाठी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी बागायतदारांकडून करण्यात आली आहे.सन २०१४-१५ मध्ये अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले असल्याने कर्ज नियमित न भरल्याने व्याजमाफीची मागणी करण्यात आली होती. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांची व्याज माफी करण्यात आली. मात्र, शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. पुनर्गठणाची सहा टक्क्यांप्रमाणे व्याजमाफी न देता १२ टक्क्यांप्रमाणे रक्कम वसूल करून बागायतदारांवर अन्याय करण्यात आला आहे.

विद्यमान फळपीक विमा योजना सदोष असून, त्याचे निकष बदलण्याची आवश्यकता आहे. कृषी बिलामध्ये झालेली वाढ तत्काळ थांबवून पूर्वीप्रमाणे कृषी पंपाची बिल आकारणी करण्यात यावी. आंबा व काजू हे कोकणातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक असून, कोकणची अर्थव्यवस्था या पिकावर अवलंबून आहे.कोकणातील आंबा बागायतदारांची कर्जमुक्ती करून त्यांना आत्महत्या करण्यापासून वाचवावे. तसेच, ७/१२ कोरा करून शेतकऱ्यांना व्यवसायात उभे राहण्यासाठी नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावीत, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. याबाबत वेळीचे योग्य निर्णय न घेतल्यास दि. २६ जानेवारी रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. धरणे आंदोलनात रत्नागिरी जिल्हा आंबा बागायतदार संघटनेेचे अध्यक्ष प्रदीप सावंत, प्रकाश साळवी, तुकाराम घवाळी, दीपक राऊत, नंदकुमार मोहिते तसेच अन्य बागायतदार सहभागी झाले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाagitationआंदोलन