शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Nitesh Rane: उद्धव ठाकरे सर्वात मोठे दलाल, महाराष्ट्र नको, लोकांच्या घरातील चुली पेटवा; नितेश राणेंचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 13:20 IST

Nitesh Rane: बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून आज कोकणात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपा आमदार नितेश राणे आमने-सामने आले आहेत.

बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून आज कोकणात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपा आमदार नितेश राणे आमने-सामने आले आहेत. दरम्यान, हुकूमशाहीच्या माध्यमातून प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र पेटवू असा इशार उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्र नाही तर लोकांच्या घरातील चुली पेटवा, असा टोला नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठा दलाल आज बारसू, रत्नागिरीमध्ये आला आहे, अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

एकीकडे उद्धव ठाकरे बारसू रिफायनरीविरोधकांची भेट घेण्यासाठी बारसूमध्ये आले असताना दुसरीकडे भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी रिफायनरीच्या  समर्थनार्थ मोर्चाचे आयोजन केले. त्यावेळी नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे पेटवा पेटवीची भाषा करत आहेत. पेटवा पेटवी करण्यासाठी ते बारसूत आले आहेत. महाराष्ट्र पेटवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मात्र  महाराष्ट्र नाही तर लोकांच्या चुली पेटवा. उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री असताना बारसूमध्ये रिफायनरी झाली पाहिजे म्हणून पत्र दिलं होतं. मात्र आता ते विरोध करताहेत. हा विचार नेमका कसा बदलला. हा विचार कोकणच्या जनतेसाठी नाही, तर खिशात पैसे आले पाहिजे. मातोश्रीवर खोके आले पाहिजे म्हणून बदलला, असा आरोप नितेश राणे यांनी केला.

उद्धव ठाकरे हे सर्वात मोठे दलाल आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठा दलाल आज बारसू रत्नागिरीत आला आहे. यांना मुंबई मनपाचे कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी, परदेशात जाण्यासाठी आणि कपड्यांची खरेदी करण्यासाठी गुजराती चालतात. आणि कोकणच्या विकासावरून विनोद करतात, याचा विचार जनतेनं केला पाहिजे. उद्धव ठाकरे आणि विनायक राऊत हे कोकणच्या विकासाला लागलेला शाप आहे. ही चपट्या पायांची माणसं कोकणात येतात आणि प्रकल्पांना विरोध करतात, असा आरोपही नितेश राणे यांनी केला. 

टॅग्स :Barsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्पUddhav Thackerayउद्धव ठाकरेNitesh Raneनीतेश राणे