खेड पोलीस निरीक्षकपदी देवरुखच्या निशा जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:31 IST2021-03-18T04:31:46+5:302021-03-18T04:31:46+5:30

रत्नागिरी : रायगड येथे बदली झालेल्या खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या जागी देवरुखच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांची ...

Nisha Jadhav of Devrukh as Khed police inspector | खेड पोलीस निरीक्षकपदी देवरुखच्या निशा जाधव

खेड पोलीस निरीक्षकपदी देवरुखच्या निशा जाधव

रत्नागिरी : रायगड येथे बदली झालेल्या खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या जागी देवरुखच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राजकीय कार्यक्रमांना परवानगी देणे तसेच त्या कार्यक्रमांना मास्क न लावता उपस्थित रहाणे या विविध कारणांमुळे वादग्रस्त झालेल्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांची बदली व्हावी यासाठी विधान परिषदेचे आमदार रामदास कदम यांनी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची दखल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेत पत्की यांची बदली रायगड येथे केली.

पत्की यांच्या जागी रायगडच्या बाळकृष्ण जाधव यांची बदली झाली होती. मात्र त्यात बदल झाला असून, नव्या आदेशानुसार देवरुखच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांची खेडला बदली करण्यात आली असल्याचे समजते. निशा जाधव यांच्या जागेवर देवरुख येथे मारुती जगताप यांची तर नाटे येथे आबासाहेब पाटील यांची बदली करण्यात आली आहे. गुहागरचे सहायक पोलीस निरीक्षक जाधव यांची दाभोळ येथे करण्यात आली आहे.

................

निशा जाधव यांचा फोटो आहे.

Web Title: Nisha Jadhav of Devrukh as Khed police inspector