निराधार फाउंडेशनची २ हजार पूरग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:30 IST2021-08-29T04:30:40+5:302021-08-29T04:30:40+5:30
चिपळूण : येथील निराधार फाउंडेशनतर्फे सुमारे २ हजार पूरग्रस्तांना सहकार्याचा हात दिला गेला आहे. यामुळे पूरग्रस्तांनी या संस्थेला धन्यवाद ...

निराधार फाउंडेशनची २ हजार पूरग्रस्तांना मदत
चिपळूण : येथील निराधार फाउंडेशनतर्फे सुमारे २ हजार पूरग्रस्तांना सहकार्याचा हात दिला गेला आहे. यामुळे पूरग्रस्तांनी या संस्थेला धन्यवाद दिले आहेत. या संस्थेच्या डॉ. अध्यक्षा ज्योती यादव, सचिव नाझीम अफवारे व इतर सदस्यांच्या सहकार्यातून ही सेवा झाली आहे.
गेल्या महिन्यात चिपळुणात अतिवृष्टी व महापुराने चिपळूणवासीयांचे अतोनात नुकसान झाले. हजारो लोकांचे संसारच उद्ध्वस्त झाले. पूर ओसरल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून राजकीय पक्षांसह सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी पूरग्रस्तांना सहकार्याचा हात दिला. यामध्ये निराधार फाउंडेशनही मागे राहिले नाही. या संस्थेने जीवनावश्यक वस्तूंच्या किटसह कपडे, भांडी असे साहित्य सुमारे २ हजार पूरग्रस्तांना दिले. यामुळे या पूरग्रस्तांना थोडासा दिलासा मिळण्यास मदत झाली. ही समाजसेवा अशीच सुरू राहील, अशी माहिती संस्थेचे सचिव नाजीम अफवारे यांनी दिली.
या संस्थेच्या माध्यमातून दोनच दिवसांपूर्वी काडवली कांगणेवाडी येथील ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. दर महिना येथील ५ ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले जाणार आहे. या वेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. ज्योती यादव, सचिव नाझिम अफवारे व उपाध्यक्ष राजेश जाधव, इमरान खतीब, संतोष सावर्डेकर आदी सदस्य उपस्थित होते.
- फोटो मेल केला आहे.