शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

नीलेश राणेंचे आव्हान विरोधकांना की मित्रपक्षाला?, लोकसभा मतदार संघात पुन्हा एन्ट्री

By मनोज मुळ्ये | Updated: November 4, 2023 17:10 IST

राजकीय संन्यास घेण्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ते अधिक जोमाने कार्यरत झाले

मनोज मुळ्येरत्नागिरी : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रत्नागिरीच्या जागेवरून सुरू झालेले शीतयुद्ध आता अधिकच भडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मध्यंतरीच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभा निवडणूक लढवतील, अशी अटकळ बांधली जाणारे माजी खासदार नीलेश राणे यांनी अचानक रत्नागिरीपर्यंत शक्तिप्रदर्शन केले आहे. मला कोणी अडवू शकत नाही, ही त्यांची गर्जना विरोधी गटातील ठाकरे शिवसेनेपेक्षा महायुतीतील शिवसेनेसाठी होती की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.शिवसेना आणि भाजपची राज्यस्तरावर युती असली तरी स्थानिक पातळीवर मात्र दोन्ही पक्षांमध्ये कायमच शीतयुद्ध राहिले आहे. शिवसेनेकडून आपल्याला कायमच डावलले गेले आहे, समित्या वाटपात आम्हाला स्थान नाही, विकासकामे होताना आम्हाला विचारात घेतले जात नाही, आमच्या ग्रामपंचायतींमध्येच विरोधी उमेदवार उभे केले जातात, असे अनेक आक्षेप भाजपकडून याआधीपासून घेतले जात होते. त्यात मध्यंतरी पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेत तत्कालीन भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. भाजपकडून विकासकामांबाबत यादी देण्यात आल्याचीही चर्चा आहे. मात्र, ती मंजूर होण्याआधीच जिल्हाध्यक्ष बदल झाला. त्यामुळे हे काम थांबले.

भाजपचे नव्याने जिल्हाध्यक्ष झालेले राजेश सावंत गेली बरीच वर्षे राजकारणात आहेत. तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क आहे. ते आधी मंत्री उदय सामंत यांचे सर्वांत जवळचे सहकारी होते. मात्र, आता त्यांच्यात अजिबात सख्य नाही. आधीच भाजपचे मंत्री सामंत यांच्याबाबाबतचे आक्षेप आणि नव्या जिल्हाध्यक्षांची भूमिका यामुळे दोन्ही पक्षांमधील युती केवळ राज्यस्तरापुरतीच राहणार असल्याचे चित्र आहे.

आधीच विविध मुद्यांवरून या दोन पक्षांमध्ये फारसे सख्य नाही. त्यात आता लोकसभा मतदारसंघाची उमेदवार हा कळीचा मुद्दा होणार आहे. उमेदवार प्रदेश स्तरावर ठरवला जाईल आणि महायुती म्हणून त्याला निवडून आणले जाईल, असे दोन्ही पक्षांच्या जिल्हा नेत्यांकडून सांगितले जात असले तरी आपापल्या उमेदवारांबाबत दोन्ही बाजूचे लोक ठाम आहेत. महायुतीच्या या वादात‘मशाल’ पेटण्याची चिन्हे अधिक आहेत.ठाकरे सेनेकडून राऊतचठाकरे शिवसेनेकडून विद्यमान खासदार विनायक राऊत यांचेच नाव सध्या तरी अंतिम आहे. निवडणुकीच्या तोंडावर एखादे मोठे पक्षांतर झाल्यास हे नाव बदलेल. अन्यथा विनायक राऊत हेच उमेदवार असतील, असे सध्याचे चित्र आहे.शिवसेनेकडून किरण सामंत यांचे नावशिवसेनेकडून उद्योजक किरण सामंत यांचे नाव बराच काळ चर्चेत आहे. किरण सामंत २०२२ पासून पडद्यासमोर येऊन काम करत आहेत. त्याआधी अनेक वर्षे ते पडद्यामागेच असले तरी राजकारणात सक्रिय होते. त्यांनी स्वत: आपल्या उमेदवाराबाबत कधीही कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र, मंत्री उदय सामंत यांनी ते उभे राहिल्यास विजय नक्की असल्याचा दावा केला आहे. यातूनच त्यांचा कल दिसत आहे.भाजपकडून तीन नावे?

  • भाजपकडून सध्या तीन उमेदवारांची नावे प्रकर्षाने पुढे येत आहेत. या मतदारसंघाचे प्रभारी प्रमोद जठार यांचे नाव सर्वात आधी चर्चेत आले. या मतदारसंघात ते सातत्याने कार्यरत होते. या मतदारसंघातील त्यांचे दौरे पाहून पत्रकारांनी ते उभे राहणार का, असे विचारल्यानंतर त्यांनी त्याचा इन्कारही केला नाही आणि स्वीकारही केला नाही.
  • त्यांच्या जोडीलाच रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांचे नावही चर्चेत आले आहे. बराच काळ पडद्यामागे असलेले बाळ माने आता चांगलेच क्रियाशील झाले आहेत.
  • आता या मतदारसंघाचे माजी खासदार नीलेश राणे यांनीही आपल्याला येथे येण्यापासून कोणीही अडवू शकत नाही, असे विधान केल्यामुळे ते इच्छुक असल्याचे दिसत आहे.

नीलेश राणे यांची अचानक एंट्रीगेली अनेक महिने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण मतदारसंघात नीलेश राणे अधिक कार्यरत होते. त्यामुळे ते लोकसभेऐवजी विधानसभा निवडणूक लढवणार, अशी अटकळ बांधली जात होती. त्यात त्यांनी राजकीय संन्यास घेण्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ते अधिक जोमाने कार्यरत झाले आहेत. त्यानंतर लगेचच त्यांनी रत्नागिरीपर्यंत शक्तिप्रदर्शन करत दौरा केला. रत्नागिरीतील भाषणात त्यांनी रत्नागिरीत येण्यापासून मला कोणीही अडवू शकत नाही, असे विधान केले. त्यामुळे आता राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. त्यांचे हे आव्हान विरोधकांना होते की मित्रपक्षाला होते, यावरच मतमतांतरे व्यक्त होत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNilesh Raneनिलेश राणे PoliticsराजकारणBJPभाजपा