रत्नागिरी व्यापारी महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी निखिल देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:31 IST2021-04-07T04:31:44+5:302021-04-07T04:31:44+5:30

रत्नागिरी तालुका व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी निखिल देसाई यांची नियुक्ती झाल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी त्यांचे अभिनंदन ...

Nikhil Desai as the taluka president of Ratnagiri Chamber of Commerce | रत्नागिरी व्यापारी महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी निखिल देसाई

रत्नागिरी व्यापारी महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी निखिल देसाई

रत्नागिरी तालुका व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी निखिल देसाई यांची नियुक्ती झाल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी त्यांचे अभिनंदन केले.

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष उदय पेठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यावर व्यापारी महासंघाची दृश्यप्रणालीद्वारे मंगळवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत नवीन कार्यकारिणी निवडून रत्नागिरी तालुका अध्यक्षपदी निखिल देसाई तर शहर अध्यक्षपदी गणेश भिंगार्डे यांची निवड करण्यात आली.

रत्नागिरीतील विविध व्यावसायिकांचा या कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. या बैठकीत उपाध्यक्षपदी राजकुमार जैन यांची निवड तर कार्यकारिणी सदस्य म्हणून रूपेश पेडणेकर, किशोर मोरे, गणेश धुरी, महेश शिरधनकर, कांचन मालगुंडकर, नीलेश मलुष्टे, प्रमोद खेडेकर, अमेय वीरकर, निमिष पटेल, साजिद मणेर, बावा चव्हाण, संजय गुंदेचा, शेखर कवितके, अमोल डोंगरे, महंमद काझी, सौरभ मलुष्टे, कौस्तुभ दीक्षित, प्रीतम भुते, असिफ अकबानी, शरद मुळीक, संजय मगळे, गुरु चौगुले, धनेश रायकर, पराग पानवलकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर तालुका अध्यक्षपदी निखिल देसाई यांची नियुक्ती झाल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीदरम्यान अभिनंदन केले. तसेच नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.

Web Title: Nikhil Desai as the taluka president of Ratnagiri Chamber of Commerce