पतीपाठाेपाठ दुसऱ्याच दिवशी पत्नीनेही साेडले जग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:51 IST2021-05-05T04:51:39+5:302021-05-05T04:51:39+5:30

असगोली : शहरातील शिवाजी चाैक येथील सन्मित्र मंडळ व तेली युवक संघाचे आधारस्तंभ आणि तालुक्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गजानन ...

The next day, the wife followed her husband | पतीपाठाेपाठ दुसऱ्याच दिवशी पत्नीनेही साेडले जग

पतीपाठाेपाठ दुसऱ्याच दिवशी पत्नीनेही साेडले जग

असगोली : शहरातील शिवाजी चाैक येथील सन्मित्र मंडळ व तेली युवक संघाचे आधारस्तंभ आणि तालुक्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गजानन ऊर्फ नाना महाडिक यांचे ३० एप्रिल रोजी तर त्यांच्या पत्नी सुनंदा महाडिक यांचे १ मे रोजी कोरोनाने खोपोली येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने शहरवासीयांना मोठा धक्का बसला आहे.

नाना हे घरबांधणी व्यवसायातील जुनेजाणते कारागीर होते. कौलारू घरे आणि त्यानंतर सिमेंटची घरे उभारण्याची कामे नाना अनेक वर्षे करत आहेत. या व्यवसायातून त्यांनी अनेक तरुणांच्या हाताला काम दिले. त्यांच्या मुशीत घडलेल्या प्रत्येक कारागिराने स्वतंत्रपणे आपला बांधकाम व्यवसाय सुरू केला आहे. शिमगोत्सवात होणाऱ्या तमाशा कार्यक्रमातील नाना हे उत्तम कलाकार होते. नाना व पत्नी सुनंदा या दोघांना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दि. ३० रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास नाना यांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने त्यांचे निधन झाले. तर शनिवारी पहाटे ५.५० वाजता त्यांची पत्नी सुनंदा महाडिक यांचेही निधन झाले. या दोघांच्या निधनाने महाडिक परिवारावर मोठा आघात झाला आहे. नाना यांना एक मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: The next day, the wife followed her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.