शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांचे नव्याने सर्वेक्षण : उदय सामंत

By मनोज मुळ्ये | Updated: July 22, 2023 18:23 IST

इर्शाळवाडीमध्ये डोंगरच अख्खा सरकला, आता याच दृष्टीकोनातून नव्याने सर्वेक्षण 

रत्नागिरी : दरड कोसळण्याचा आतापर्यंतचा अनुभव म्हणजे डोंगरावरील दगड माती मोठ्या प्रमाणात खाली येते. पण रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीमध्ये आलेला अनुभव खूपच वेगळा होता. तेथे डोंगरच अख्खा सरकला आहे. त्यामुळे आता याच दृष्टीकोनातून जिल्ह्यातील दरडग्रस्त ठिकाणांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. आठ ते दहा दिवसात त्याचा अहवाल मिळेल, असेही ते म्हणाले.पालकमंत्री सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. इर्शाळवाडीत झालेल्या दुर्घटनेनंतर मंत्री उदय सामंत तेथे मध्यरात्रीच पोहोचले होते. तेथील मदत कार्याला दिशा देतानाच त्यांनी सर्व प्रकार जवळून पाहिला. त्याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, आतापर्यंत जेथे कोठे दरड कोसळली, तेथे डोंगरावरील माती, दगड, झाडेझुडपे खाली आले. पण इर्शाळवाडीमध्ये डोंगरच पुढे आला आहे. अपघातग्रस्त वस्ती १५० वर्षांपूर्वीची आहे. असे आतापर्यंत कोकणात कधी झाले नव्हते. असा प्रकार इतरत्रही होऊ शकतो. त्यासाठीच आता नव्याने सर्वेक्षण केले जाणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील दरडग्रस्त भागांचे सर्वेक्षण झाले आहे. तेथे आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. लोकांना स्थरलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण हे सर्व आतापर्यंतच्या अनुभवावर आधारित आहे. इर्शाळवाडीतील दुर्घटनेमुळे नवाच प्रकार समोर आला आहे. अशा पद्धतीने डोंगरच हलला तर तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळेच आपण जिल्हाधिकारी यांना नव्याने सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीlandslidesभूस्खलनRaigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणUday Samantउदय सामंत