शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनवृध्दीसाठी रत्नागिरीला नवा लूक : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 20:33 IST

Thiba Palace Tourisam Ratnagiri- पर्यटनाच्या दृष्टीने रत्नागिरी शहर राज्यातील नामवंत शहर व्हावे, यासाठी . जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या माध्यमातून हा बदल केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक निधी विविध खात्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देथिबा राजवाड्यात जे. जे. स्कूल ऑफ आर्ट म्युझियम मारुती मंदिर सर्कल सुशोभिकरणासाठी १ कोटी रूपयांचा निधी मंजूर

रत्नागिरी : पर्यटनाच्या दृष्टीने रत्नागिरी शहर राज्यातील नामवंत शहर व्हावे, यासाठी शहराला नवा लूक देण्याचा प्रयत्न असून, साळवी स्टॉप ते मांडवी व शहरांतर्गत असलेले चौक वेगळ्या पद्धतीने विकसित करण्याचा मानस आहे.

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या माध्यमातून हा बदल केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक निधी विविध खात्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे तज्ज्ञ प्राध्यापक रत्नागिरीत दाखल झाले होते. त्यांनी थिबा राजवाड्याची पाहणी केली. थिबा राजवाड्यात जे. जे. स्कूल ऑफ आर्ट म्युझियम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्याचा पाठपुरावा करण्यासाठी पुन्हा जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे तज्ज्ञ प्राध्यापक रत्नागिरी शहरात आले आहेत. त्यांनी थिबा राजवाड्यासह शहरातील मुख्य चौकात मारुती मंदिर सर्कल, श्यामराव पेजे पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सावरकर चौक, मांडवी जेटी आदींची पाहणी केली.मारुती मंदिर सर्कल सुशोभिकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चौकांच्या सुशोभिकरणासाठी पर्यटन, जिल्हा नियोजन त्या माध्यमातून निधी उपलब्ध करून कामाला सुरुवात केली जाणार आहे.

टाकाऊपासून कायमस्वरूपी रेखीव काम जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी शहरात करणार आहेत. या सर्वांच्या माध्यमातून शहराला नवा लूक दिला जाणार आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नाविन्यपूर्ण शहर होणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

थिबा राजवाडा जतन, संवर्धनाचे काम थांबले आहे. पुरातत्त्व विभागातर्फे या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पाठपुरावा करण्याची सूचना मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.वैयक्तिक कारणराज्यातील लोणेरे, जळगाव येथील दोन विद्यापीठाच्या कुलगुरूंनी राजीनामा त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे दिला असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेले वर्षभर ते राजीनामा देण्याच्या तयारीत होते. राजकीय हस्तक्षेपामुळे कुलगुरूंनी राजीनामा दिला हे आरोप चुकीचे व खोडसाळ आहे. त्यावरून राजकारण करणे चुकीचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Thiba Palaceथिबा पॅलेसRatnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतtourismपर्यटन