बसवर झळकणार गावांचे नवे फलक

By Admin | Updated: August 22, 2014 00:51 IST2014-08-21T20:34:41+5:302014-08-22T00:51:02+5:30

एस. टी. महामंडळ : अस्पष्ट नामफलक होणार दूर

A new board of villages will be seen on the bus | बसवर झळकणार गावांचे नवे फलक

बसवर झळकणार गावांचे नवे फलक

अडरे : चिपळूण एस. टी. आगारातील बसमध्ये लावण्यात येणारे नावाचे फलक जीर्ण झाले आहेत. ते बदलून आता नव्याने ६०० नामफलक तयार करण्याचे काम सध्या सुरु असून, गणेशोत्सवाच्या काळात हे नवीन फलक झळकणार आहेत.
चिपळूण एस. टी. आगारातून धावणाऱ्या एस. टी. बसला लावण्यात येणारे गावाच्या नावांचे नामफलक खराब झाले होते. अनेक वर्षांपासून हे नामफलक बदलून नवीन फलक तयार करण्याची मागणी होत होती. याची दखल घेत चिपळूण आगाराने आता ६०० नवीन फलक बनविण्याचे काम हाती घेतले आहे. लवकरच हे फलक लावण्यात येणार आहेत.
चिपळूण आगारातून ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्यांना लावण्यात येणारे फलक स्पष्ट दिसत नव्हते. यामुळे प्रवाशांना गाडीचे नाव समजत नव्हते. यामुळे चालक व वाहकांना अनेक वेळा प्रवाशांच्या रोशाला सामोरे जावे लागायचे. त्यांना प्रवाशांचे बोल ऐकावे लागायचे. गाडी कोणती आहे, याचे उत्तर देताना बसमधील प्रवासीही अनेकवेळा हैराण होत होते. याबाबत चालक, वाहक व प्रवाशांच्याही तक्रारी आगार व्यवस्थापक एस. बी. सय्यद यांच्याकडे वारंवार येत होत्या. याची दखल घेऊन सय्यद यांनी नवीन फलक तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे फलक लागल्यानंतर प्रवाशांना एस. टी. कोणत्या गावाकडे मार्गस्थ होणार आहे, याची माहिती मिळणार आहे. यामुळे प्रवासी भारमानात वाढ होणार आहे.
सध्या प्रवासी वाढवा अभियान सुरु आहे. तसेच एस. टी.मध्ये विविध योजना राबवण्यामध्ये काही प्रमाणात तत्कालिन आगारप्रमुख सोहनी यशस्वी झाले होते. यानंतर नूतन आगारप्रमुख एस. बी. सय्यद यांनीही धोरणात्मक निर्णय घेऊन एस. टी. प्रशासनामध्ये शिस्त, चालक वाहकांमध्ये समन्वय आणण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच नवीन एस. टी. बसेस सुरु केल्या. अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच गाड्यांच्या नावांचा फलक बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: A new board of villages will be seen on the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.