जिल्ह्यात ३८९ कोरोना रूग्णांची नव्याने भर; ८ मृत्युंची नाेंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:24 IST2021-06-04T04:24:40+5:302021-06-04T04:24:40+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३८९ कोरोना रूग्णांची नव्याने भर पडली आहे. यात आरटीपीसीआर चाचणीत पाॅझिटिव्ह आलेल्यांची संख्या ...

New addition of 389 corona patients in the district; 8 deaths recorded | जिल्ह्यात ३८९ कोरोना रूग्णांची नव्याने भर; ८ मृत्युंची नाेंद

जिल्ह्यात ३८९ कोरोना रूग्णांची नव्याने भर; ८ मृत्युंची नाेंद

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३८९ कोरोना रूग्णांची नव्याने भर पडली आहे. यात आरटीपीसीआर चाचणीत पाॅझिटिव्ह आलेल्यांची संख्या १८२ असून, ॲन्टिजन चाचणीत २०७ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. एका दिवसात आठजणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या ३८,४६१ इतकी झाली आहे तर आतापर्यंत १,२७९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

गुरूवारी जिल्हा रूग्णालयाकडून आलेल्या २४ तासांच्या अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने ३८९ कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात बाधितांची टक्केवारी १७.८३ टक्के आणि मृत्यूची टक्केवारी ३.३२ टक्के इतकी आहे.

गुरुवारी एकाच दिवसात आठजणांच्या मृत्यूची नाेंद झाली आहे. यात रत्नागिरी तालुक्यातील २, दापोली ३, चिपळूण तालुक्यातील दोन आणि गुहागर तालुक्यातील एका रूग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात गुरूवारी पाच पुरूष आणि तीन महिला रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: New addition of 389 corona patients in the district; 8 deaths recorded