मंडणगड नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या श्रुती साळवी

By Admin | Updated: November 28, 2015 00:20 IST2015-11-27T23:13:58+5:302015-11-28T00:20:43+5:30

उपनगराध्यक्षपदी श्रद्धा लेंडे : निवड बिनविरोध; मंडणगडमध्ये महिला राज

NCP's Shruti Salvi is the president of Mandangad town | मंडणगड नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या श्रुती साळवी

मंडणगड नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या श्रुती साळवी

मंडणगड : मंडणगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या श्रुती साळवी यांची, तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या श्रद्धा लेंडे यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. केवळ राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाइं महाआघाडीच्या वतीनेच दोन्ही पदांसाठी अर्ज भरण्यात आल्याने शुक्रवारी निवडीची औपचारिकताच बाकी होती.दापोलीचे प्रांताधिकारी जयराम देशपांडे, तहसीलदार कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत व्यापारी संकुलातील सचिवालयात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणूक झाली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे प्रांताधिकाऱ्यांनी घोषित केले. यावेळी सर्व नगरसेवक, महाआघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचे अभिनंदन करण्यासाठी महाआघाडीच्या वतीने नगरपंचायत सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रदेश काँग्रेस प्रवक्ते भाई जगताप, आमदार संजय कदम, माजी आमदार चंद्रकांत मोकल, भाई पोस्टुरे, जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर, सिद्धार्थ कासारे, दादासाहेब मर्चंडे, स. तु. कदम, मुश्ताक मिरकर, संतोष मांढरे, विजय पोटफोडे, रत्ना लेंडे, राजाराम लेंडे, वैभव कोकाटे, कादीर बुरोंडकर, संदेश चिले, सुनील घरटकर यांच्यासह महाआघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)


महाआघाडीचा जोश मावळला, नाराजांचा बहिष्कार नगरपंचायत निवडणुकीदरम्यान महाआघाडीचा गवगवा होता. त्याकाळात महाआघाडीने घेतलेल्या सर्व कार्यक्रमांत आघाडीची एकजूट असल्याची प्रचिती येत होती.
मात्र, शुक्रवारी महाआघाडीचा जोश मावळल्यासारखा दिसला. एरव्ही कोणत्याही कार्यक्रमात प्रचंड उत्साहात असणाऱ्या आमदारांची उपस्थितीबद्दलची नाराजी चेहऱ्यावर लपून राहिली नाही.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नाराज विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रकाश शिगवण, तालुकाध्यक्ष सुलतान मुकादम, युवक तालुकाध्यक्ष अनिल रटाटे यांनी शुक्रवारच्या कार्यक्रमावरही बहिष्कार टाकला.
शिगवण समर्थकही या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. हा गट नेमका कोणता, याचे गणित राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते कार्यक्रमाच्या ठिकाणी करताना दिसत होते.

Web Title: NCP's Shruti Salvi is the president of Mandangad town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.