राष्ट्रवादी काॅंग्रेसचे रास्ता राेकाे आंदाेलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST2021-07-04T04:21:32+5:302021-07-04T04:21:32+5:30

लांजा : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम धिम्यागतीने होत असल्याने काढण्यात आलेल्या पर्यायी मार्गावर पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडल्याने ...

NCP's Rasta Raeka movement postponed | राष्ट्रवादी काॅंग्रेसचे रास्ता राेकाे आंदाेलन स्थगित

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे रास्ता राेकाे आंदाेलन स्थगित

लांजा : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम धिम्यागतीने होत असल्याने काढण्यात आलेल्या पर्यायी मार्गावर पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवार, दि. ६ जुलै रोजी करण्यात येणारे रास्ता रोको आंदाेलन स्थगित करण्यात आले आहे.

मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामात वाकेड ते मठ या मार्गावर खड्डेच खड्डे पडले आहेत. हे खड्डे भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवार, दि. ६ जुलै रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अभियंता मिलिंद मडकईकर यांनी शनिवारी लांजा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन महामार्गावरील व लांजा शहरातील रस्त्याचे काम हे तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे, असे आश्वासन दिले. यावेळी खजिनदार संजय खानविलकर, युवक तालुकाध्यक्ष बाबा धावणे, युवक शहरध्यक्ष दीपक शेट्ये, दाजी गडहिरे उपस्थित होते.

Web Title: NCP's Rasta Raeka movement postponed