राष्ट्रवादीचे खेड शहराध्यक्ष सतीश चिकणे यांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:35 IST2021-09-05T04:35:14+5:302021-09-05T04:35:14+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क खेड : वरिष्ठ नेते पक्ष वाढविण्यासाठी मनाप्रमाणे काम करू देत नसल्याने राष्ट्रवादी शहराध्यक्ष व पक्ष सदस्यत्वाचा ...

NCP's Khed city president Satish Chikane resigns | राष्ट्रवादीचे खेड शहराध्यक्ष सतीश चिकणे यांचा राजीनामा

राष्ट्रवादीचे खेड शहराध्यक्ष सतीश चिकणे यांचा राजीनामा

लाेकमत न्यूज नेटवर्क

खेड : वरिष्ठ नेते पक्ष वाढविण्यासाठी मनाप्रमाणे काम करू देत नसल्याने राष्ट्रवादी शहराध्यक्ष व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सतीश चिकणे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन दिली. आगामी काळात कोणत्या पक्षातून काम करणार, हे मात्र चिकणे यांनी लवकरच जाहीर करणार असल्याचे यावेळी सांगितले.

खेड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सतीश चिकणे यांनी त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यावेळी चिकणे यांच्यासोबत शहर सचिव तुषार सापटे उपस्थित होते. यावेळी चिकणे यांनी सांगितले की, पक्ष स्थापनेपासून गेली २२ वर्षे मी राष्ट्रवादी पक्षाचे काम करत होतो. गेल्या चार वर्षांपासून माझ्याकडे पक्षाने शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. परंतु, गेल्या पालिका निवडणुकीत पक्षाचे चिन्ह बाजूला ठेवून आघाडी झाली आणि तेव्हापासून मला शहराध्यक्ष म्हणून शहरात पक्ष वाढविण्यासाठी वरिष्ठ पदाधिकारी व नेते काम करू देत नाहीत. गेल्या दीड वर्षापासून पक्षाच्या शहरातील राजकारणात कोणत्याही निर्णय प्रक्रियेत मला सहभागी करून घेतले जात नसून, अक्षरशः गळचेपी सुरू आहे, असा आराेप त्यांनी यावेळी केला. शहराध्यक्षपद हा शोभेचा मुकुट मला आता नको, असे मी पक्षश्रेष्ठीना सांगूनही त्यांनी कोणतेही लक्ष दिलेले नाही. त्यामुळे मी पक्षातील माझ्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करून पक्षाच्या पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, असे चिकणे यांनी सांगितले.

शहरात राष्ट्रवादी दुसऱ्या पक्षाचे नेते वाढवत आहेत, असा समज पसरवला जात आहे. आगामी पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्य व जिल्हा पातळीवरील राजकीय समीकरणांचा विचार न करता कोणतीही पावले खेड शहरात राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी व नेत्यांकडून उचलली जात नसल्याची खंत चिकणे यांनी यावेळी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच प्रदेश सरचिटणीस आपल्याला पक्षवाढीसाठी कोणतेही सहकार्य करत नसल्याचा दावा यावेळी चिकणे यांनी केला.

Web Title: NCP's Khed city president Satish Chikane resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.