शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यानंतर महायुतीही उतरणार मैदानात - सुनील तटकरे 

By मनोज मुळ्ये | Updated: July 29, 2023 15:25 IST

रिफायनरी प्रकल्पाबाबत बोलताना ते म्हणाले की, जेव्हा एखादा प्रकल्प राज्याच्या, देशाच्या हिताचा असतो, तेव्हा त्यात राजकारण आणता येत कामा नये

रत्नागिरी : प्रत्येक पक्षाला आपली संघटना वाढवण्याचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाचा उत्तर भारतीयांचा मेळावा घेत आहेत, ही बाब त्यांच्या पक्षाशी संबंधित आहे. महायुती म्हणून राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना पावसाळ्यानंतर सभा, बैठका सुरू करेल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी दिली.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी रत्नागिरीत आलेल्या सुनील तटकरे यांनी प्रसार माध्यमंशी संवाद साधला. ठाकरे शिवसेना उत्तर भारतीयांचा मेळावा घेणार आहे. त्याविषयी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे महाअधिवेशन घेतले होते. यात पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी आपल्या दीर्घ भाषणात पक्षाची ध्येयधोरणे मांडली आहेत. त्यानुसारच पक्षाची भूमिका असेल ते म्हणाले. राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र येणार का, असा प्रश्न करण्यात आला असता ते म्हणाले की, काही काळ थांबावे लागेल. काळाच्या ओघात त्याची उत्तरे मिळतील.महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपल्याला काम करता आले नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. याबाबतच्या प्रश्नावर तटकरे म्हणाले की, अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अजितदादांचे योगदान खूप मोठे आहे. सकाळी ७ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत ते मंत्रालयात काम करत असत. पण त्यांच्या क्षमतेचा उपयोग करुन घेतला गेला नाही.रिफायनरी प्रकल्पाबाबत राजकीय पक्षांच्या भूमिका सतत बदलत आहेत. यावर बोलताना ते म्हणाले की, जेव्हा एखादा प्रकल्प राज्याच्या, देशाच्या हिताचा असतो, तेव्हा त्यात राजकारण आणता येत कामा नये. जी गोष्ट लोकांच्या हिताची आहे, त्यात पक्षाची भूमिका महत्त्वाची असता नये. एखाद्या प्रकल्पाची गरज, त्याचे फायदे, रोजगाराची उपलब्धता त्याबाबतची सर्व माहिती लोकांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी राजकीय पक्षांची आहे. प्रकल्पाशी निगडीत चांगल्या वाईट गोष्टी लोकांना समजावून सांगायला हव्यात. लोकांचे शंकानिरसन करायला हवे. मात्र रिफायनरीबाबत तसे झाले नाही.

संभाजी भिडेंवर कारवाई व्हावीमहात्मा गांधी यांच्याबद्दल केवळ देशातच नाही तर जगात आदर व्यक्त केला जातो. त्यांच्याबाबत संभाजी भिडे यांनी केलेले विधान अत्यंत चुकीचे आहे. राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाई करायला हवी, असे मत खासदार सुनील तटकरे यांनी मांडले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsunil tatkareसुनील तटकरे