योगदिनानिमित्त एनसीसीच्या छात्रसैनिकांची प्रात्यक्षिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2015 00:24 IST2015-06-21T22:35:00+5:302015-06-22T00:24:44+5:30

उत्स्फूर्त प्रतिसाद : विविध महाविद्यालयांचा सहभाग

NCC students' training demonstrations on the occasion of Yogidi | योगदिनानिमित्त एनसीसीच्या छात्रसैनिकांची प्रात्यक्षिके

योगदिनानिमित्त एनसीसीच्या छात्रसैनिकांची प्रात्यक्षिके

रत्नागिरी : जगभरात साजरा करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला रत्नागिरीकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. योग दिनानिमित्त राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे(एनसीसी) आयोजित योग उत्सवात रत्नागिरी जिल्ह्यातील ९०४ छात्रसैनिक सहभागी झाले होते.कोस्ट गार्ड विमानतळाच्या हँगरमध्ये आयोजित या कार्यक्रमास कोस्ट गार्ड कमांडट एस.एम.सिंंग, दोन महाराष्ट्र नेव्हल युनिट रत्नागिरीचे कमांडिंग आॅफिसर कमांडर विध्येश उंदिरे, योग शिक्षक अनंत आगाशे उपस्थित होते. राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्याच्या दृष्टीने देशभरात एकाचवेळी सकाळी ७ ते ७.३० या वेळेत योग प्रात्यक्षिके करण्यात आली. या उपक्रमांतर्गत देशात एकूण ११ लाखापेक्षा जास्त एनसीसीचे छात्रसैनिकांनी एकाचवेळी योग प्रात्यक्षिके सादर केली. यात कोल्हापूर गट मुख्यालयातंर्गत रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील १२ हजार ८०० छात्रसैनिकांचा समावेश होता. त्याअंतर्गत रत्नागिरी येथील कार्यक्रमात २ महाराष्ट्र नेव्हल युनिट, रत्नागिरी, ५ महाराष्ट्र बॉईज बटालियन, ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या ६२६ छात्रसैनिकांनी आणि खेड येथील आयसीएस महाविद्यालय येथे १९ महाराष्ट्र, एनसीसी युनिटच्या २४८ छात्रसैनिकांनी योग प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी कमांडर विध्येश उंदिरे यांनी मार्गदर्शन करताना योग व प्राणायाम आपल्या आयुष्याचे अविभाज्य घटक असल्याचे सांगितले. योग हा मन व शरीर यामध्ये सामंजस्याचे काम करतात. दररोज योग हा प्रत्येक भारतीयाने करावा यासाठी योगदिन म्हणजे पहिली पायरी आहे. प्रत्येकाने आजपासून योग सराव करण्याची प्रतिज्ञा करावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी आयोजनात सहकार्य करणाऱ्यांंचा एनसीसीमार्फत सत्कार करण्यात आला. प्रात्यक्षिक कार्यक्रमात इयत्ता आठवी ते पदवी अभ्यासक्रमाचे छात्रसैनिक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: NCC students' training demonstrations on the occasion of Yogidi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.