एनसीसी छात्रांचा ‘फिट इंडिया फ्रीडम रन’मध्ये सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:32 IST2021-08-15T04:32:35+5:302021-08-15T04:32:35+5:30

रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय क्रीडा आणि युवा कार्य मंत्रालयातर्फे आयोजित ‘फिट इंडिया फ्रीडम रन २.०’मध्ये ...

NCC students participate in 'Fit India Freedom Run' | एनसीसी छात्रांचा ‘फिट इंडिया फ्रीडम रन’मध्ये सहभाग

एनसीसी छात्रांचा ‘फिट इंडिया फ्रीडम रन’मध्ये सहभाग

रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय क्रीडा आणि युवा कार्य मंत्रालयातर्फे आयोजित ‘फिट इंडिया फ्रीडम रन २.०’मध्ये गोगटे महाविद्यालयाच्या नौदल राष्ट्रीय छात्रसेनेच्या छात्रांनी सहभाग घेतला.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय क्रीडा आणि युवा कार्य मंत्रालयातर्फे ‘फिट इंडिया फ्रीडम रन २.०’ दि. १३ ऑगस्ट ते दि. २ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत या राष्ट्रव्यापी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर गोगटे - जोगळेकर महाविद्यालयातील नौदल राष्ट्रीय छात्र सेना विभाग आणि २ महाराष्ट्र नेव्हल राष्ट्रीय छात्र सेना युनिट, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने छात्रांसाठी शुक्रवार, दि. १३ ऑगस्ट रोजी महाविद्यालयाचे जवाहर क्रीडांगण ते भाट्ये समुद्रकिनारा असे ‘फिट इंडिया फ्रीडम रन २.०’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या एन. सी. सी.च्या २० आणि १० छात्रांनी सहभाग घेतला.

महाविद्यालायाचे प्रभारी डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी दौड सुरू करण्यासाठी झेंडा दाखवल्यानंतर छात्रांनी भारतीय स्वातंत्र्याचा जयघोष करत दौड सुरू केली. कार्यक्रमाची समाप्ती जवाहर क्रीडांगणावर एनसीसी छात्रांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतल्यानंतर झाली. यावेळी एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट अरुण यादव, कॅप्टन सीमा कदम आणि एनसीसी युनिटमधील सर्व ट्रेनिंग ऑफिसर उपस्थित होते.

Web Title: NCC students participate in 'Fit India Freedom Run'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.