शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

गटबाजीत बुडालेल्या रत्नागिरी काँग्रेसला नवसंजीवनी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 12:10 IST

रत्नागिरी जिल्ह्यात एकही लोकनियुक्त प्रतिनिधी नसला तरीही काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण अजूनही कायम आहे. या गटबाजीतून रमेश कदम यांना जिल्हाध्यक्ष पदावरून डच्चू देत अ‍ॅड. विजय भोसले यांची तेथे नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या बदलातून नवसंजीवनीची अपेक्षा काँग्रेसचे पदाधिकारी करत आहेत.

ठळक मुद्देगटबाजीत बुडालेल्या रत्नागिरी काँग्रेसला नवसंजीवनी?सर्वच तालुक्यांना आली आहे मरगळ

रत्नागिरी : जिल्ह्यात एकही लोकनियुक्त प्रतिनिधी नसला तरीही काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण अजूनही कायम आहे. या गटबाजीतून रमेश कदम यांना जिल्हाध्यक्ष पदावरून डच्चू देत अ‍ॅड. विजय भोसले यांची तेथे नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या बदलातून नवसंजीवनीची अपेक्षा काँग्रेसचे पदाधिकारी करत आहेत.चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा ठेवून काँग्रेसने त्यांना लोकसभा निवडणुकीआधी जिल्हाध्यक्ष पदावर बसवले. मूळचे काँग्रेसवासी असलेले कदम हे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काँग्रेसपासून दुरावले. २००४ ते २००९ याकाळात ते चिपळूणचे आमदार होते. त्यानंतरच्या काळात भास्कर जाधव यांच्याशी असलेल्या वादामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. त्यात मोठा पुढाकार खासदार हुसेन दलवाई यांचा होता.रमेश कदम यांनी जिल्हाध्यक्ष पदाच्या काळात पक्षासाठी काहीच ठोस केले नाही, हा आक्षेप त्यांच्यावर घेतला गेला. त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या काळात अनेक तालुक्यांमध्ये पक्षाची बैठकच झाली नाही. त्याशिवायच जिल्हा कार्यकारिणी तयार केली गेली. त्यामुळे एका गटाने त्याला जोरदार आक्षेप घेतला. तेथून त्यांच्या विरोधातील वातावरण वाढले.

रमेश कदम यांना पक्षात घेण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, त्यांनीच नंतर कदम यांच्या डोक्यावरील हात काढून घेतला. त्यामुळे कदम यांच्याविरोधात तक्रारींचे प्रमाण वाढले होते.आता खेडच्या अ‍ॅड. विजय भोसले यांची काँगे्रसच्या जिल्हाध्यक्ष पदावर निवड झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत एकही पदाधिकारी नसलेल्या काँग्रेसला आता त्यांच्याकडून नवसंजीवनीची अपेक्षा आहे.सर्वच तालुक्यांना आली आहे मरगळसद्यस्थितीत राजापूर वगळता अन्य कोणत्याही तालुक्यात काँग्रेस एकसंध नाही. राजापुरातही गटाचे राजकारण तीव्र आहे. त्यामुळे गटबाजीने त्रस्त झालेल्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे आणि एकत्र ठेवण्याचे मोठे आव्हान अ‍ॅड. भोसले यांना पेलावे लागणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRatnagiriरत्नागिरी