नाशिकचा पारा आणखी घसरला

By Admin | Updated: December 6, 2015 23:57 IST2015-12-06T23:56:17+5:302015-12-06T23:57:06+5:30

थंडी वाढली : किमान तपमान ११.६ अंशांवर

Nashik's mercury dropped further | नाशिकचा पारा आणखी घसरला

नाशिकचा पारा आणखी घसरला

नाशिक : कालपासून उतरणीला लागलेला शहराचा पारा आणखी घसरला असून, रविवारी पहाटे शहराचे किमान तपमान ११.६ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. हे राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे नीचांकी तपमान होते.
पंधरा ते वीस दिवसांपूर्वी नाशिकमध्ये थंडी पडण्यास प्रारंभ झाला होता. गेल्या २० नोव्हेंबर रोजी शहरात मोसमातील नीचांकी तपमानाची नोंद (११.५) झाली होती; मात्र या दरम्यान निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यासह शहराला पावसाने झोडपून काढले होते. ढगाळ वातावरणामुळे शहराचा पारा वाढला होता. आता हे वातावरण पूर्णत: निवळल्याने पुन्हा तपमान घटण्यास प्रारंभ झाला आहे. गेल्या पाच दिवसांत पाऱ्यात तब्बल सहा अंशांनी घसरण झाली आहे. त्यामुळे पहाटे व रात्री थंडीचा कडाका जाणवू लागला आहे.

Web Title: Nashik's mercury dropped further

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.