शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणातील तीन कातभट्ट्यांवर नाशिकच्या वनविभागाचा छापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 12:51 IST

खैर तस्करीप्रकरणी नाशिक वन विभागाने चाैघांना अटक केली आहे

चिपळूण : नाशिकच्या हवेत खैर तस्करी प्रकरणाचे धागेदाेरे थेट चिपळूणपर्यंत पाेहाेचल्याने मंगळवारी सकाळी नाशिकच्या वन विभागाने तालुक्यातील तीन कातभट्ट्यांवर छापा टाकला. या छाप्यात सावर्डेतील कातभट्टी फॅक्टरीला सील ठाेकले असून, दहिवली बु. येथील फॅक्टरींच्या मालकाला नाेटीस बजावली आहे.वन विभागाच्या पथकाने सावर्डे-कुंभारवाडी येथील सिंडिकेट फूड्स फॅक्टरीवर धाड टाकली. या धाडीत मोठ्या प्रमाणात अवैध खैरसाठा आढळला. या कारवाईदरम्यान फॅक्टरीचे मालक विक्रांत तेटांबे तिथून पळून गेल्याचे लक्षात आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना समन्स बजावला आहे. या फॅक्टरीमधील कागदपत्रे व पुस्तके, वाहतूक पासेस, टॅबलेट पुढील चौकशी जप्त केले आहे. या फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणात कात ज्यूस व रेडिमेड कात आढळला आहे. हा कात नाशिकच्या जंगलातील खैर लाकडापासून बनवल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने फॅक्टरीला सील ठोकण्यात आले आहे.

त्यानंतर दहिवली खुर्द येथील सचिन कात फॅक्टरी व तिरुपती कात फॅक्टरी येथे धाड टाकण्यात आली. या ठिकाणीही अवैध खैरसाठा सापडला. या दोन्ही फॅक्टरीचे मालक सचिन ऊर्फ पिंट्या पाकळे हे अनुपस्थित असल्याने पुढील चौकशी करता आली नाही. येथील कर्मचाऱ्यांनी तपासकामात सहकार्य न केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत वन विभागाने दिले आहेत.विभागीय वन अधिकारी विशाल माळी, काेल्हापूरचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन व मुख्य वनसंरक्षक रामानुजन यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश गवारी, वनपरिक्षेत्र अधिकारी सविता पाटील, वनपाल दुसाने सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली. मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी त्यांना स्थानिक मदत केली.

चिपळूणशी धागेदाेरेखैर तस्करीप्रकरणी नाशिक वन विभागाने चाैघांना अटक केली आहे. त्यातील दाेघे उत्तर प्रदेशमधील तर उर्वरित दाेघे गुजरातचे आहेत. त्यानंतर या खैर तस्करीचे धागेदोरे दहशतवादाशी असल्याचे निष्पन्न हाेताच दहशतवादविराेधी पथकाने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. या तपासात खैर तस्करीचे धागेदाेरे चिपळूणशी जाेडले गेले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणforest departmentवनविभाग