मोदींसाठी पेढे; पण गीते कौतुकाविना

By Admin | Updated: May 28, 2014 01:33 IST2014-05-28T01:21:18+5:302014-05-28T01:33:14+5:30

फटाक्यांची आतषबाजी

Narendra Modi But do not appreciate it | मोदींसाठी पेढे; पण गीते कौतुकाविना

मोदींसाठी पेढे; पण गीते कौतुकाविना

गुहागर : नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याने घवघवीत विजय मिळविणार्‍या भाजपच्या ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी नरेंद्र मोदींच्या शपथविधीनंतर फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटले. मात्र, अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत सुनील तटकरेंना पराभूत करत तब्बल सहाव्यांदा खासदार बनलेल्या आणि तिसर्‍यांदा केंद्रात मंत्रीपदी विराजमान होणार्‍या खासदार अनंत गीते यांचे मात्र त्यांच्याच मतदारसंघातील गुहागर तालुक्यात कौतुक झाले नाही. देशभरातील भाजप कार्यकर्त्यांनी विजयोत्सव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भाजपच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. शृंगारतळी येथे नागरिकांसाठी मोठ्या पडद्यावर शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. मोठ्या संख्येने उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी विनय नातू, प्रशांत शिरगावकर, लक्ष्मण शिगवण, महेश कोळवणकर आदींसह फटाक्यांची आतषबाजी करत विजयी जल्लोष केला. पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. गुहागरमध्येही मोठा पडदा, फटाके आणि पेढे असा उत्साह वाहत होता. एकीकडे भाजप नेते आणि कार्यकर्ते विजयोत्सव साजरा करत असताना तालुका शिवसेनेत मात्र शांतता होती. गुहागर विधानसभा क्षेत्रात आमदार रामदास कदम आणि अनंत गीते यांच्यामध्ये सुरु असलेल्या शीतयुद्धाचे पडसाद काही प्रमाणात निवडणुकीत मतदानातून उमटले होते. तरीही पक्षनिष्ठा म्हणून गीतेंना मतदान करणार्‍या व मोठ्या प्रमाणात असलेल्या कदम समर्थकांनीही गीतेंच्या मंत्रीपदाचा आनंद साजरा करण्यापेक्षा घरी बसणेच पसंत केले. गीते समर्थक म्हणवणारेही या क्षणी दिसले नाहीत. (वार्ताहर)

Web Title: Narendra Modi But do not appreciate it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.