शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढला टक्का, नेमका कुणाला बसणार धक्का

By मनोज मुळ्ये | Updated: May 9, 2024 16:42 IST

आता प्रतीक्षा निकालाची, तोपर्यंत चर्चांना वेग

मनोज मुळ्येरत्नागिरी : दीड महिना सुरू असलेली राजकीय धामधूम मंगळवारी मतदानानंतर संपली असली तरी निकालासाठी आणखी पाऊण महिना वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे आता कोण जिंकणार, कोण हरणार अशा चर्चांना ऊत आला आहे. जिल्हा क्षेत्र म्हणून विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यात ०.२९ टक्के मतदान कमी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १.०९ टक्के इतकेच मतदान वाढले आहे. त्यातही रत्नागिरी विधानसभा मतदार संघात सुमारे ३ टक्के मतदान कमी झाले आहे आणि कणकवलीमध्ये सुमारे २ टक्के मतदान वाढले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढलेले हे मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार, याच मुद्द्यावर चर्चा फिरत आहेत.टपाली मतदानासह एकूण मतदान ६३.२० टक्के इतके झाले आहे. गत लोकसभा निवडणुकीत ते ६१.९१ टक्के इतके होते. मतदानामध्ये प्रशासनाला प्रथम श्रेणी मिळाली असली तरी विशेष श्रेणी मिळालेली नाही. मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात निरुत्साह दिसून आला. मतदार यादीतील नाव गायब झाले, केंद्र बदलले अशा काही तक्रारी होत्या. मात्र मोठ्या प्रमाणात लोक मतदानासाठी बाहेर पडले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.बुधवारी सायंकाळी मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार या मतदारसंघात गतवेळेपेक्षा थोडेच मतदान अधिक झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहता राजापूर, कणकवली आणि सावंतवाडी या तीन मतदारसंघात गत निवडणुकीपेक्षा यावेळी मतदान वाढले आहे तर रत्नागिरी मतदारसंघात ते कमी झाले आहे.

गणिते फायद्यातोट्याची

  • मतदान संपल्यापासूनच मतदानाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार फायद्यातोट्याची गणिते मांडली जात आहेत. कुणाला फायदा होणार आणी कुणाला तोटा यावर अधिक चर्चा होत आहेत.
  • कणकवली मतदारसंघात आमदार भाजपचे म्हणजे महायुतीचे आहेत. त्यामुळे तेथे वाढलेले मतदान महायुतीला फायदेशीर ठरू शकते, असा ढोबळ अंदाज आहे.
  • राजापूर मतदारसंघातील आमदार उद्धवसेनेचे म्हणजे महाविकास आघाडीचे आहेत. तेथे आघाडीला फायदा होऊ शकतो.
  • या चर्चा कितीही झाल्या तर सामान्य माणसाचा अंदाज मात्र कोणताही पक्ष देऊ शकत नाही.
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narayan Raneनारायण राणेVinayak Rautविनायक राऊत