शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

'नारायण राणे राष्ट्रीय नेते, त्यांच्यावर बोलण्याइतकी दीपक केसरकरांची उंची नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 16:35 IST

मुख्यमंत्री शिंदेंनी आमदार केसरांवर दिलेली प्रवक्तेपदाची जबाबदारी म्हणजे लहान तोंडी मोठा घास देण्यासारखा आहे.

सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांनी काय बोलावे आणि काय बोलू नये, हे सांगण्याइतपत आमदार दीपक केसरकर यांची उंची नाही. उगाच नाही तेथे तोंड खुपसू नका, अन्यथा परिणाम वाईट होतील, असा इशारा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. भविष्यात केसरकरांच्या मांडीला मांडी लावून बसणार नसल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. यावेळी भाजपचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, बंटी पुरोहित, दिलीप भालेकर, विनोद सावंत आदी उपस्थित होते. परब म्हणाले, संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्याने शिवसेना संपवली.  त्याचप्रमाणे भविष्यात केसरकर हे मुख्यमंत्री शिंदे यांना महाग पडतील. त्यामुळे राणेंवर बोलल्यास आम्ही गप्प बसणार नाही, तसेच भविष्यात काहीही झाले तरी आम्ही केसरकरांशी जुळवून घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका परब यांनी यावेळी मांडली.ते पुढे म्हणाले की, युती असली तरीही वरिष्ठ नेत्यांना आमचे म्हणणे पटवून देऊ, मनधरणी करू पण आगामी पालिका निवडणुकीत ताकदीने उतरून वीसही जागा निवडून आणू, असा विश्वास ही परब यांनी व्यक्त केला.ते पुढे म्हणाले की, नारायण राणे यांच्याकडे जिल्हा परिषद, जिल्हा बँक, पंचायत समिती, नगरपालिका व जिल्ह्यातील सर्व सत्ता केंद्रे आहेत. मात्र, स्वतःला जिल्ह्याचा नेता समजणाऱ्या केसरकर यांच्याकडे साधी शहरातील नगरपालिकाही नाही. त्यामुळे गल्लीतील नेते असलेल्या केसरकरांनी गल्लीतच बोलावे. उगाच दिल्लीत जाऊन मोठ्या गमजा मारू नये. बंडानंतर जिल्ह्यात परतलेल्या केसरकरांसोबत साधे २० कार्यकर्तेही नव्हते. त्यामुळे आता त्यांनीच काय ते ठरवावे, असे ही परब म्हणाले.मुख्यमंत्री शिंदेंनी आमदार केसरांवर दिलेली प्रवक्तेपदाची जबाबदारी म्हणजे लहान तोंडी मोठा घास देण्यासारखा आहे.  केसरकर हे आग लावत सुटले असून, मोठमोठ्या नेत्यांवर बोलून आपली किंमत वाढवत आहेत. केसरकर उद्या शिंदे यांनाही धोकादायक ठरतील, अशी भीतीही व्यक्त केली. कधीच स्वतःच्या जिवावर मोठे न झालेले केसरकर यांचा राजकीय इतिहास हा आयत्या बिळावर नागोबा असाच राहिला आहे. ते एक नंबर संधिसाधू राजकारणी आहेत, अशी टीकाही यावेळी परब यांनी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNarayan Raneनारायण राणे Dipak Kesarkarदीपक केसरकर