मराठा समाजातर्फे आज नारायण राणे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:35 IST2021-08-24T04:35:43+5:302021-08-24T04:35:43+5:30

रत्नागिरी : जन आशीर्वाद यात्रेनिमित्त २४ ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे रत्नागिरीत येत आहेत. त्यानिमित्त मराठा समाजातर्फे रत्नागिरीमध्ये ...

Narayan Rane felicitated by Maratha community today | मराठा समाजातर्फे आज नारायण राणे यांचा सत्कार

मराठा समाजातर्फे आज नारायण राणे यांचा सत्कार

रत्नागिरी : जन आशीर्वाद यात्रेनिमित्त २४ ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे रत्नागिरीत येत आहेत. त्यानिमित्त मराठा समाजातर्फे रत्नागिरीमध्ये करण्यात येणार आहे.

मराठा समाजाच्या अडचणी, समस्या आणि वस्तुस्थिती जाणून आर्थिक स्तरावर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राणे यांनी राणे समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी सातत्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पाठपुरावा केला आहे. मराठा समाजाच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले आहेत. राणे यांनी नुकतीच केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रीपदी शपथ घेतली आहे. कॅबिनेट मंत्री पद स्वीकारल्यानंतर राणे प्रथमच रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त समस्त सकल मराठा समाजातर्फे त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

हा सत्कार सोहळा मंगळवार, दि. २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता रत्नागिरी शहरातील मराठा भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी समस्त मराठा बांधवांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Narayan Rane felicitated by Maratha community today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.